अमित शहांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

0
10
मुंबई, दि. 18 –  भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज सकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे सुद्धा उपस्थित होते. या भेटीदरम्यान उद्धव ठाकरे, अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांच्यात सुमारे तासभर चर्चा झाली. या सर्चेचा सविस्तर तपशील अद्याप आलेला नसला तरी सरसंघचालक मोहन भागवत किंवा डॉ. स्वामिनाथन यांना रालोआचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार करावे, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी शहांकडे केल्याचे समजते.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आज सकाळीच मातोश्रीवर दाखल झाले होते. अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रावसाहेब दानवे हेसुद्धा मातोश्रीवर आले होते. ठाकरे आणि शहा यांच्यात होणाऱ्या भेटीदरम्यान राष्ट्रपती निवडणूक तसेच इतर विषयांवर चर्चा झाल्याचे समजते.