अर्जुनी मोरगाव,दि.19-शासन यंत्रणेतील भ्रष्टाचाराचे समूळ निर्मूलन करण्याचे धोरण राबविण्यासाठी शासन परिपत्रकाच्या अधीन राहून जिल्हाधिकारी गोंदिया यांनी गोंदिया जिल्हा भ्रष्टाचार समिती व दक्षता पथक गठीत केले. या जिल्हास्तरीय समितीवर अर्जुनी मोरगाव तालुक्यातील उमाकांत ढेंगे व व्यंकट खोब्रागडे यांची अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे.
गोंदिया जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी हे आहेत. सदस्य म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.गोंदिया, पोलीस अधीक्षक गोंदिया, पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गोंदिया, कार्यकारी अभियंता लघु सिंचन जलसंधारण गोंदिया, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग गोंदिया, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गोंदिया, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था गोंदिया, सदस्य सचिव निवासी उपजिल्हाधिकारी गोंदिया तस शासकीय सदस्य म्हणून कविता रंगारी, घनश्याम अग्रवाल, व्यंकट खोब्रागडे, विनोद किराड, रतन वासनिक, रमेश टेंभरे, बसंतकुमार गणवीर, विश्वजीत डोंगरे, नरेश शेंडे, उमाकांत ढेंगे यांची नियुक्ती झाली आहे.
उपरोक्त अशासकीय सदस्यांचा कालावधी हा आदेश निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून दोन वर्षाचा राहील. अशासकीय सदस्य म्हणून सध्या करण्यात आलेल्या नियुक्त्या त्या सदस्यांचा दोन वर्षाचा कालावधी पूर्ण होईपर्यंत कायम राहणार आहे.





