पुराम गडचिरोली,देशमुख व मानकर नाशिक तर इस्कापे

0
7

गोंदिया,दि.21-सरकारच्या ग्रामविकास मंत्रालयाच्यावतीने आज करण्यात आलेल्या बदल्यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील चार अधिकार्यांच्या बदल्या केल्या.त्यामधे नाशिक विभागातून आलेले राजेश देशमुख व तिरोड्याचे बीडीओ मानकर यांनी सुरुवातीपासूनच कधी गोंदिया जिल्ह्याशी जुळवून घेतले नव्हते.त्यांची परत नाशिक विभागात बदली झाली आहे.गोंदिया जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्यकार्यकारी असलेले राजेश देशमुख यांची नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात तपासणी सहाय्यक आयुक्त म्हणून बदली झाली आहे.देशमुख गोंदियात आले तेव्हापासूनच परतीसाठी प्रयत्नात लागले होते अखेर 2017 मध्ये त्यांना यश आले आहे.त्यांच्या जागेवर चंद्रपूर जिल्हा परिषदेचे पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.व्ही.राठोड यांची नियुक्ती केली आहे.सर्वाधिक गोंदिया जिल्हा परिषदेत चर्चेत राहिलेले आणि 2016 च्या बदलीमध्ये शासनाच्याविरोधात मॅटमध्ये गेलेले सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार पुराम यांची गडचिरोली जिल्हा परिषदेचे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली झाली आहे.त्यांनी गोंदियात प्रभारी म्हणून काम केल्याने गडचिरोली जिल्ह्याला त्याचा नक्कीच लाभ मिळणार आहे.परंतु त्यांना ही डिमोशन पोस्ट असल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात सुरु झाली आहे.तिरोडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एच.एस.मानकर यांची बदली गटविकास अधिकारी चांदवड येथे करण्यात आली आहे.मानकर यांनी गेल्याच महिन्यात मग्रारोहयोच्या अभियंत्यानी गैरव्यवाहर केल्याची तक्रार केली होती.ही तक्रार बदलीच्या एक महिना आधी केल्याने या तक्रारीकडे आता शंकेच्या नजरेने बघितले जात आहे.गोंदिया पंचायत समितीचे गटविकास अधिकारी ईस्कापे यांची बदली वाशिम जिल्हा परिषदेत पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून करण्यात आली आहे.