राष्ट्रीय ओबीसी महासंघाची आज नियोजन जिल्हास्तरीय बैठक

0
5
गडचिरोली,दि.24- राष्ट्रीय ओबीसी महासंघ , ओबीसी विद्यार्थी संघटना व तसेच ओबीसीतील मोडत असलेल्या सर्व जात संघटना च्या वतीने उद्या दिनांक 25 जून रविवार ला शिवाजी महाविद्यालय धानोरा रोड गडचिरोली येते 12 वाजता विद्यार्थी , कार्यकर्ते , पदाधिकारी यांची बैठक आयोजित केले आहे. ओबीसी समाजाची जातीनिहाय आकडेवारी जाहीर करून , केंद्रात ओबीसी समाजासाठी स्वतंत्र्य मंत्रालय स्थापन करणे , मंडल आयोग , नचिप्पन आयोग , स्वामिनाथन आयोग यांची सर्व शिफारसी लागु कराव्यात , ओबीसी क्रिमिलेयर ची असवीधनिक जाचक अटी रद्द करण्यात यावे , ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नती मध्ये आरक्षण देण्यात यावे , ओबीसीसाठी विधानसभा व लोकसभा येथे स्वतंत्र्य मतदारसंघ निर्माण करण्यात यावे , ओबीसी शेतकऱ्यांना वनहक्क पट्यासाठी लावलेली  तीन पिढ्यांची अट रद्द करण्यात यावी , राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला संविधानिक दर्जा देण्यात यावा या मागण्या मंजूर करून घेण्यासाठी या बैठकित राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे दुसरे महाधिवेशन 7 आॅगस्ट रोजी दिल्ली येथे घेण्यात आले आहे.या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संघटक शेषराव येलेकर , राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष रुचित वांढरे ,दादाजी चापले , अरुण पाटील मूनघाटे ,विनायक बांदुरकर , दादाराव चूधरी ,राहुल भांडेकर , तुषार वैरागडे ,अतुल वाढई , बादल गडपायले , शुभम भस्मावर , नयन कुणघाडकर ,चेतन शेंडे ,साईनाथ जेंघटे , प्रीतम ठाकरे ,अक्षय ठाकरे , आकाश निकोडे , विकास जेंघटे , रमेश निखुरे ,सचिन नैताम ,आकाश सोनटक्के , पंकज खोबे , श्रीकांत मूनघाटे , प्रदीप ठेंगरी , तुषार मंगर , पंकज धोटे , लोकमान्य बरडे , नंदू नाकतोडे , शुभम खोडवे , प्रफुल निकुरे यांनी केले आहे.