मागण्यांच्या पूर्ततेसाठी आयुध कामगार संघाचे निवेदन

0
10

भंडारा,दि.26 : रक्षा मंत्रालयाचा निर्णय राष्ट्रहितार्थ नाही. देशातील आयुध निर्माणीमध्ये उत्पादन होणारे काही साहित्याची निर्मिती खासगी कंपनीच्या हातात देऊन आयुध निर्माणीचे भविष्यावर प्रश्नचिन्ह होत आहे, या कारणावरुन राष्ट्रीयस्तरावर भारतीय मजदूर संघाने निषेध केल आहे. याप्रसंगी आयुध निर्माणी भंडारा स्थित मजदूर संघाने अतिरिक्त जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

निवेदनात, देशातील आयुध निर्माणी बंद होऊ नये, कोणत्याही निर्माणीचे खासगीकरण करण्यात येऊ नये, आयुध निर्माणीचे तांत्रिक स्वरुपात मजबुतीकरण करण्यात यावे, निती आयोगाचे पुनर्गठन करण्यात यावे, आयुध निर्माणीचे उत्पादने ‘नॉन कोर’ संबंधी आदेश परत घ्यावे, एकदा सुट देऊन अनुकंपाच्या आधारावर सर्व प्रकारांमध्ये निवड करण्यात यावे, नवीन पेंशन रद्द करुन जुन्याच धर्तीवर पेंशन स्किम लागु करण्यात यावी, सातव्या पेंशन आयोगासंबंधी भत्त्यांचे वितरण करण्यात यावे आदींचा मागण्यांमध्ये समावेश आहे. शिष्टमंडळात आयुध निर्माणी येथील भारतीय मजदुर संघाचे राष्ट्रीय संयुक्त सचिव डी. टी. लिल्हारे, अध्यक्ष आर. बिसेन, सचिव एस. बांते, सदस्य वाय. झंझाड, राजाराम, एस. आर. वाहने, जी. जी. कावळे यांचा समावेश होता.