१२ जानेवारीला गडचिरोलीत कमल-गोविंद स्मृती प्रतिष्ठानचे उदघाटन

0
18
वाढदिवसाच्या शुभेच्छा

गडचिरोली, ता.१०ज्येष्ठ कवी, कादंबरीकार व दंडकारण्य शिक्षण व संशोधन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत गो.ना.मुनघाटे व त्यांच्या अर्धांगिणी दिवंगत कमलताई मुनघाटे यांच्या कार्याची ज्योत सतत तेवत राहावी, या हेतूने दंडकारण्य परिवाराच्या वतीने कमल-गोविंद स्मृती प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली आहे.
या प्रतिष्ठानचे उदघाटन १२ जानेवारीला सायंकाळी ७ वाजता गडचिरोली येथील विद्याभारती कन्या हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात होणार आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार मारोतराव कोवासे, तर प्रमुख अतिथी म्हणून खासदार अशोक नेते,आ. विजय वडेट़टीवार, आ.डॉ. देवराव होळी, आ.क्रिष्णा गजबे, गोंडवाना विध्यापीठाचे कुलगुरु डॉ. कीर्तीवर्धन दीक्षित, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, माजी मंञी धर्मरावबाबा आञाम, बाबासाहेब वासाडे व अरविंद सावकार पोरेड़डीवार उपस्थित राहणार आहेत.यावेळी”आठवणीतील गाणी” हा संगीत मैफलीचा कार्यक्रमही सादर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्राचार्य भैयासाहेब ठाकरे यांनी केले आहे.