नागरिकांनी काढली चिनी साहित्याचे अंत्ययात्रा

0
10

अर्जुनी मोरगाव,दि.०९-गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुकामुख्यालय असलेल्या गावात एका व्हाटसअप गृपच्यावतीने पुढाकार घेत चिनी साहित्याचा विरोध करुन चिनच्यावतीने भारतावर वारंवार आक्रमण करण्याचा दिला जात असलेल्या इशाराच्या निषेध नोंदविण्यासाठी चिनीवस्तुवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेत आज चिनीवस्तुंची अंत्ययात्रा काढून स्मशानभूमीत चिनीवस्तु जाळण्यात आले.व्हाटसअपगृपमध्ये असलेल्या व्यापारी,सामाजिक कार्यकर्ते,अधिकारी,कर्मचारी आदींनी चिनच्या भूमिकेबद्दल शंका व्यक्त करीत चिनीवस्तुचा वापर बंद करण्यावर चर्चा सुरु केली आणि त्या वस्तु गोळा करुन अंत्ययात्रा काढण्याची भूमिका सदस्यांनी मांडली त्यावर सदस्यासह नागरिकांनी प्रतिसाद दिला.राजकिशोर शहा यांनी चिनीवस्तु गोळा केल्यानंतर आज सकाळी अर्जुनी मोरगाव येथील दुर्गा चौकातून चिनीवस्तुची अंत्ययात्रा काढण्यात आली.ही अंत्ययात्रा महाराणा प्रताप चौक मार्ग स्मशानभूमीत पोचली.या अंत्ययात्रेत तालुक्यातील गोठणगाव येथे असलेल्या तिबेटीयन वसाहतीमधीन तिबेटीनागरिकांनी सुध्दा मोठ्या संख्येने सहभागी होऊन चिनच्या भूमिकेचा व चिनीवस्तुचा निषेध नोंदविला.चिनीवस्तु जाळल्यानंतर स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले.या सर्व कार्यक्रमाचे संचालन ओमप्रकाशqसह पवार यांनी केले.एस.एस.जायस्वाल महाविद्यालय,सरस्वती विद्यालय व राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थीही यात सहभागी झाले होते.या अंत्ययात्रेत नगराध्यक्ष पोर्णिमा शहारे,नगरसेविका यमू ब्राम्हणकर,माजी सभापती उमाकांत ढेंगे,डा.गजानन डोंगरवार,अनिरुध्द ढोरे,सुरेंद्र ठवरे यांनी विचार व्यक्त करुन चिनच्या भूमिकेचा निषेध नोंदवित चिनीवस्तुवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले.इंजि.आनंदकुमार जांभुळकर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा घेण्यात आली.