आईसह सहा महिन्याचा मुलगा नदीत वाहून गेले

0
6

दोघांचे प्रेत मिळाले, आमगाव तालुक्यातील सावंगी येथील घटना
आमगाव,दि.18: वाघनदीच्या पात्रात आईसह सहा महिन्याचा मुलगा वाहून गेल्याची घटना १७ जुलै रोजी दुपारी ३ वाजता सांवगी ढिवरटोला येथे घडली. वाहून गेलेल्या आईसह मुलाचे मृतदेह मिळाले असून मृतकाचे नाव दुर्गा खनोज भगत (३०) व मुलगा जितू खनोज भगत (६) असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आमगाव तालुक्यातील सावंगी-ढिवरटोला येथे वाघनदी परिसरातील दुर्गा खनोज भगत व मुलगा जितू खनोज भगत हे दोन्ही नदी परिसराजवळून नदीच्या वाहत्या प्रवाहात आल्याने वाहून गेले. दुपारी नागरीक नदी परिसरातून जात असताना आई व मुलगा वाहत असताना आढळले. यावेळी नागरिकांनी तहसीलदार साहेबराव राठोड व पोलीस विभागाला दिली. नागरिकांनी यावेळी धावपळ करीत वाहत्या व्यक्तींना वाचविण्याचा प्रयत्न केला, परंतु शोध लागला नाही. नदीच्या वाहत्या प्रवाहात शोध घेण्यासाठी स्थानिक नागरीकांनी शर्तीचे प्रयत्न केले. सायंकाळी ५ वाजता दोन्ही प्रेत नदी पात्रातून बाहेर काढण्यात यश मिळाले. यावेळी आपत्ती व्यवस्थापन समिती, तहसीलदार राठोड, पोलीस प्रशासनाने दखल घेवून मतद कार्य केले. मृतक आई आपल्या सहा महिन्याच्या मुलासह नदीपात्र परिसरात कशासाठी गेली याचे कारण अज्ञात असल्याची माहिती तहसिलदारांनी दिली.