राहुल गांधीवरील भ्याड हल्ल्याचा काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध

0
20

भंडारा,दि.१० काँग्रेस उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांच्यावरील भ्याड हल्ला ही लोकशाहीला काळीमा फासणारी घटना असून सरकारने हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांनी केली आहे. भंडारा जिल्हा काँग्रेसच्या वतीने सदर घटनेचा निषेध नोंदविण्यात आला तसेच मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना मा जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन पाठविण्यात आले.
गुजरात मधील बनासकांठा येथे पूरग्रस्तांना भेटण्यासाठी गेलेल्या खा. राहुल गांधी यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा निषेध करून प्रेमसागर गणवीर म्हणाले की, राहुल गांधी हे राष्ट्रीय नेते असल्याने त्यांच्या सुरक्षेची काळजी घेणे ही राज्य सरकारची जबाबदारी असताना राज्य सरकारतर्फे सुरक्षा व्यवस्थेत जाणिवपूर्वक कमरता ठेवली असे दिसून येते.या हल्ल्यामागे निश्चितपणे विकृत मानसिकता असून देशपातळीवर भाजपचे सरकार आल्यानंतर राजकीय व्यवस्थेत अनैतिकता प्रबळ होताना दिसून येत आहे. येनकेनप्रकारे सत्ता मिळवणे व त्याकरिता पैसा, गुंडगिरी, हिंसा यासह कोणताही अलोकतांत्रिक मार्ग वापरण्याची तयारी ही भाजपची कार्यशैली राहिली आहे. अशी टीका सुद्धा यावेळी त्यांनी केली.याचेच प्रतिक गुजरातमध्ये खा. राहुल गांधी यांच्यांवर झालेल्या हल्ल्यातून दिसून येते. हा हल्ला म्हणजे विरोधकांना राजकारणातून संपवण्याचा डाव आहे अशी शंका येते. भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करत असून अशा भ्याड हल्ल्याने काँग्रेसचे नेतृत्व आणि कार्यकर्ते घाबरणार नसून या विकृत आणि देशविघातक विचारधारेचा मुकाबला अधिक जोमाने करतील असे असे प्रेमसागर गणवीर म्हणाले. निषेध करतांना आणि निवेदन देतांना जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, महेंद्र निंबार्ते, अनीक जमा पटेल, डॉ विनोद भोयर, राजकपूर राऊत, प्यारेलाल वाघमारे, प्रभुजी मोहतुरे, शंकर राऊत, अमर रगडे, राजेश ठाकूर, प्रशांत देशकर, अजय गडकरी, सचिन घनमारे, नगरसेविका जयश्री बोरकर, जाबीर मालाधारी, जिल्हापरिषद सदस्य प्यारेलाल वाघमारे, पृथ्वीराज तांडेकर,मुकुंद साखरकर, जनार्धन निंबार्ते, भारती लिमजे, शमीम पठाण, भावना शेंडे, कमलेश बाहे, के.के. पंचबुद्धे, नीरज गौर, इमरान पटेल, कुसन भुरे, गणेश लिमजे,अंबादास मंदूरकर,मंगेश हुमणे, राजू सूर्यवंशी, विनोद जगनाडे, संजय पिकलमुंडे, संजय लोंढेकर, सौरभ बोरकर, हिरामण लांजेवार, टी.डी. मारबते,अंकुश बनकर, एच.एल. लांजेवार,बंडू लांबट, इरफान पटेल, शर्मिल बोदेले, शंतनू मोहिते, श्री भोंगाडे, श्री बोन्द्रे, मनोहर वहिले, विनोद राहुलकर, बंटी नेवारे, कैलास नागदेवे, जीवनु भजनकर, शेख नबाब, सचिन फाले, विनीत देशपांडे, पराग खोब्रागडे, अंकुश वंजारी, इत्यादी कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. इत्यादी कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.