31.2 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ गोंदिया जिल्हा शाखा अभियंता संघटनेच्या अध्यक्षपदी बिसेन व सचिव ढोमणे

गोंदिया जिल्हा शाखा अभियंता संघटनेच्या अध्यक्षपदी बिसेन व सचिव ढोमणे

0
37

blank

गोंदिया,दि.16-गोंदिया जिल्ह्यातील विविध विभागात कार्यरत असलेल्या अभियंता व शाखा अभियंत्यांच्या गोंदिया जिल्हा शाखा अभियंता संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी येत्या तीन वर्षासाठी जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता इंजि.गोवर्धन बिसेन यांची तर सचिवपदावर बांधकाम विभागाचे शाखा अभियंता विजय ढोमणे यांची निवड करण्यात आली.13 आॅगस्टला होटल केसर येथे पार पडलेल्या संघटनेच्या सर्वसाधारण सभेला 39 सदस्य उपस्थित होते.यात मागील सभेचे कार्यवृत्ताचे वाचन करुन ते कायम करण्यात आले.तसेच जमाखर्चाला मंजुरी सादर करण्यात आली.यावेळी संघटनेकडे 84 हजार 547 रुपयाचा निधी शिल्लक असल्याचे सदस्यांना सांगण्यात आले.या सभेत सेवानिवृत्त अभियंते व पदोन्नत अभियंत्यांचा सत्कार करण्यात आला.तसेच पुढील तीन वर्षासाठी कार्यकारीणीची निवड करण्यात आली.यामध्ये कोषाध्यक्ष पदाकरिता अभियंता विजय धारकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.नविन पदाधिकार्यांना निवर्तमान अध्यक्षांनी पदाची शपथ दिली.निवडणुक अधिकारी म्हणून सेवानिवृत्त उपविभागीय अभियंता शरद क्षत्रिय होते.नवनिर्वाचित अध्यक्ष बिसेन यांनी संघटनेचे काम करतांना त्यांच्यातील कौशल्याचे उपयोग करुन संघटना बळकट करण्यासाठी तसेच सदस्याचे समस्यांवर तातडीने तोडगा काढण्यावर प्राथमिकता राहणार असल्याचे सांगितले.सर्वांचे आभार सचिव विजय ढोमणे यांनी मानले.

blank