संस्थेचा उत्कर्ष होणे हीच खरी दिवंगत पदाधिकार्यांना श्रद्धांजली- प्रा.अरुण कडबे

0
30

लाखनी,दि.19(प्रशांत वाघाये)-राष्ट्रीय शिक्षण संस्थेतील संस्थापक सदस्य अचानक निघून जाण्याने संस्थेची फोकळी भरून काढणे अशक्य आहे.संस्थेतर्गत असलेला मोठा घटकसंस्थांचा व्याप आणि त्यातील ४०० हुन अधिक कर्मचार्यांना या दुःखामुळे धाडस मिळावे.यासाठी श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी संस्थेचा उत्कर्ष होणे हीच खरी दिवंगत पदाधिकार्यांना श्रध्दाजंली ठऱणार असल्याचे विचार प्रा.अरुण कडबे यांनी व्यक्त केले. येथील राष्ट्रीय शिक्षण संस्थेतील माजी कोषाध्यक्ष मोहन परशुराम भांडारकर,माजी कार्यवाह न.ता.फरांडे,मुरलीधर भांडारकर आणि मंसाराम गिर्हेपुंजे आदी पदाधिकारी या वर्षभरात दिवंगत झाले. त्यांच्या आत्म्यास अभिवादन करण्यासाठी आज राष्ट्रीय शिक्षण संस्थेतील पदाधिकारी,कर्मचारी यांनी श्रद्धांजली कार्यक्रम घेतला.श्रद्धांजली कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी विद्यार्थी आणि माजी शिक्षणाधिकारी चिंतामण बागडे होते.प्रा.अरुण कडबे,उत्तमराव वरकड,शिवलाल रहांगडाले,प्रल्हाद सोनवणे,चिंतामण बागडे,प्रदीप फरांडे,अतुल भांडारकर यांनी यावेळी आठवणी आणि शोकसंवेदना व्यक्त केल्या.संस्थाध्यक्ष आल्हाद भांडारकर,सहकार्यवाह डेबुजी धांडे,मधुकर लाड,शिवलाल रहांगडाले,बाळा रणदिवे,प्रल्हाद सोनवणे,चिंतामण बागडे,अतुल भांडारकर,देवराम चाचेरे,उमराव बावनकुळे,अरुण कडबे,उत्तमराव वरकड,मुख्याध्यापक ताराराम हुमे समर्थ विद्यालय लाखनी,संध्या हेमणे, सुरेश कामथे, प्रमोद धार्मिक,अरविंद रामटेके,ज.रा.कोल्हारे,सुरेश भांडारकर,पवन पडोळे,नाना रहाटे,रुपेश नागलवाडे,भूमिता नवखरे,थेर गुरुजी,लेकराम भगत,भरत बडोले आदी उपस्थित होते. प्रास्तविक मुख्याध्यापक ताराराम हुमे व सूत्रसंचालन नागपुरे यांनी केले.