महिला नगराध्यक्षाकडून नगरसेवकांना अट्रासिटी व विनयभंगाच्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न

0
12

गोंदिया,दि.20- जिल्ह्यातील सडक अर्जुनी नगरपंचायतीच्या १७ नगरसेवकापैकी १४ नगरसेवकांनी विद्यमान नगराध्यक्ष रिता अजय लांजेवार व उपाध्यक्ष महिन्द्र मसराज यांच्या विरोधात १४ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारीकडे अविश्वास प्रस्ताव सादर केल्यानंतर नगराध्यक्ष रिता लांजेवारकडून १५ ऑगस्टला नगरपंचायतचे विरोधी पक्ष नेते दिनेश अग्रवाल यांच्या दुकानात जाऊन व एका नगरसेवकाला पानठेल्यावर गाठून अट्रासिटी व विनयभंगाच्या खोट्या प्रकरणाखाली अडकविण्याचा त्यांचा हेतू असल्याचा आरोप येथील विश्रामगृहात घेतलेल्या पत्रपरिषदेत करण्यात आला.सोबतच अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याèया सर्व १४ नगरसेवकांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी जिल्हा पोलीस अधिक्षकांना करण्यात आली असून कायद्याचा दुरउपयोग करणाèया या जनप्रतिनिधीचे सदस्यत्व शासनाने रद्द करावे,सोबतच अॅट्रासिटी कायद्याच्या दुरुपयोग थांबवावा अशी मागणी विरोधी पक्षनेते दिनेश अग्रवाल यांच्यासह नगरसेवकांनी केली आहे.
मागील २० महिन्या आधी झालेल्या नगर पंचायतीच्या निवडणूकीत सडक अर्जुनी येथे कुणालाच बहुमत मिळाले नाही भाजपाचे ४,राष्ट्रवादी कांग्रेसचे ५,कांग्रेसचे ३ व अपक्ष ५ सदस्य निवडूण आले.कांग्रेस व अपक्षाने समर्थन दिल्याने नगराध्यक्षपदी अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या पदासाठी रिता अजय लांजेवार यांची निवड झाली तर उपाध्यक्ष पदी आदिवासी समाजाचे महिन्द्र राधेश्याम मसराम यांची निवड झाली.मात्र नगराध्यक्षच्या मनमानी व भ्रष्ट कारभारामुळे नगरसेवक त्रस्त झाले व १७ पैकी १४ नगरसेवकांनी त्यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव सादर केला.या अविश्वास प्रस्तावावर २३ ऑगस्ट रोजी सभा होणार आहे.यामुळे विथरून जाऊन हा अविश्वास प्रस्ताव पारित होवू नये यासाठी कायदेशीर मार्गा ऐवजी नगराध्यक्ष व त्यांचे सहकारी अट्रासिटी कायद्यात अडकविण्याची भाषा वापरत आहेत.
१५ ऑगस्ट रोजी नगर पंचायत सडक अर्जुनी समोर अविश्वास दाखल करणाèयांना शिविगाळ केली.त्याच दिवशी सायंकाळी विरोधी पक्ष नेते दिनेश अग्रवाल यांच्या दुकानात गेले.त्यावेळी त्यांच्या सोबत अजय लांजेवार तसेच चार मुली सोबत होत्या.त्या सर्वाचा उद्देश अट्रासिटी qकवा विनयभंगाच्या आरोपाखाली अडकविण्याचा होता.मी सुदैवाने त्या ठिकाणीनसल्याने त्यांचा बेत ङ्कसला १६ ऑगस्ट रोजी नगरसेवक बाबादास येरोला हे लतिङ्क शेख यांच्या पानठेल्यावर असतांनाही त्यांनी अशीच धमकी दिली.१७ ऑगस्टला महेन्द्र मसराम यांनीही चौकात पानठेल्यावर अविश्वास पारित केला तर जिवानीशी ठार मारू अशी धमकी दिली.
या प्रकरणी अविश्वास प्रस्ताव सादर करणारे देवचंद तरोणे,अभय राऊत,महेश सुर्यवंशी,बाबादास येरोला,प्रियंका उजवणे,दिनेश अग्रवाल,रेहान शेख,ज्योती गिरेपूंजे,शशीकला टेंभूर्णे,जिजाबाई पटोले,ताराबाई मडावी,चंद्रप्रभा मुनिश्वर,कविता पात्रे,शिला प्रधान,मोहन कुमार शर्मा यांनी डुग्गीपार पोलीसांना तक्रार करून आम्हाला खोट्या तक्रारीत फसविण्याचा किंवा अपहरण करण्याची भिती असून आम्हाला पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी केली आहे.सदर प्रकरणामुळे सडक अर्जुनी येथील राजकीय वातावरण तापले असून येत्या २३ ऑगस्टपर्यंत काही वाईट तर घडणार नाही अशी शंका व्यक्त केली जात आहे.या प्रकरणी जिल्हा प्रशासन काय करते याकडे सर्वांचे लक्ष आहे.पत्रपरिषदेला येरोला राष्ट्रवादीचे नगर सेवक देवचंद तरोणे,कांग्रेसचे नगर सेवक अभय राऊत उपस्थित होते.