सालई(खुर्द) फाटयावर 24 ला शिवसेनेचा रास्ता रोको आंदोलनाचा इशारा

0
13

तुमसर,दि.20 -तालुक्यातील सालई खुर्द,टांगा,उसर्रा,पिंपळगाव,डोंगरगाव,सिहोरा,बपेरा अशा अनेक गावात बावनथडी प्रकल्पाचे कालवे अस्तव्यस्त असल्यामुळे शेतकèयांना पाणी मिळत नाही. त्या कालव्यांची अतिशिघ्र दुरूस्ती करून शेतकèयांना सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्यात यावी.कालव्याचे पाणी मिळत नसल्यामुळे दोन शेतकèयांनी प्राण गमविले.त्यांच्या कुटूंबाला शासनाकडून आर्थिक सहाय्यता देण्यात यावी.निम्यापेक्षा कमी रोवणे झाले असून जिल्हयात दुष्काळ पडला आहे.त्यामुळे जिल्हा दुष्काळग्रस्त घोषीत करण्याच्या मागण्यांसाठी सालई खुर्द फाटयावर शिवसेनेच्या वतीने २४ ऑगष्ट रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना जिल्हाध्यक्ष इंजि. राजेंद्र पटले यांनी दिला आहे. तसे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकाèयांना पाठविले आहे.