पंचायत समितीच्या मासिक सभेवर पदाधिकार्यांचा बहिष्कार

0
6

गड़चिरोली,दि.25:कुरखेडा पंचायत समितीच्या दरमहिन्याल्या होणार्या मासिक सभेत अनेकदा सूचना देऊनही विभाग प्रमुखांनी सभेला दांडी मारून आपल्या प्रतिनिधींना पाठविल्याने संतप्त झालेल्या सभापतीसह पदाधिकाºयांनीच मासिक सभेवर बहिष्कार घालत सभागृहासमोर ठिय्या दिला. त्यामुळे प्रशासनात खळबळ माजली. कुरखेडा पंचायत समितीची सभा गुरूवारी पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती.
या सभेला तालुका कृषी अधिकारी जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग, महाराष्टÑ राज्य विद्युत वितरण कंपनी, देलनवाडी, कुरखेडा, मालेवाडा, पुराडाचे वनपरिक्षेत्राधिकारी, कढोली व मालेवाडातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी अनुपस्थित होते. याबाबत पदाधिकाºयांनी तीव्र रोश व्यक्त केला. अधिकारी मासिक सभेबाबत व विकास कामांबाबत गंभीर नसल्याचे दिसून येत आहे, असाही आरोप केला. विकास कामांमध्ये होणारी अनियमितता उघड करू नये, यासाठी अधिकारी गैरहजर राहत असल्याचा आरोप केला. सदर सदस्यांवर कारवाई करावी, अशी मागणी सभापती गिरिधर तितराम, उपसभापती मनोज दुणेदार, पं. स. सदस्य बौद्धकुमार लोणारे, श्रीराम दुग्गा, संध्या नैताम, शारदा पोरेटी, सुनंदा हलामी, माधुरी मडावी, वर्षा कोकोडे, कविता गुरनुले यांनी केली आहे.