25.5 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home विदर्भ बहुजन युवा मंचच्यावतीने रस्ता दुरूस्तीसाठी भीख मांगो आंदोलन

बहुजन युवा मंचच्यावतीने रस्ता दुरूस्तीसाठी भीख मांगो आंदोलन

0
24
गोंदिया,दि.04- येथील बहुजन युवा मंचच्यावतीने गोंदिया नगर परिषद प्रशासनासह जिल्हा प्रशासनाला जागृत करण्यासाठी तसेच शहरातील रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी भीख मांगो आंदोलन रविवारला करण्यात आले.आंदोलना दरम्यान शहरातील रस्त्यावर पडलेल्या सुंदर खड्यामुळे शहराच्या सौंदर्यिकरणात भर पडल्याची उपहासात्मक टिका करीत हे खड्डे बुजविण्यासाठी प्रशासनाकडे पैसे नसल्याने भीख मांगो आंदोलनाच्या माध्यमातून गोळा झालेला निधी जिल्हाप्रशासनाला रस्ते व खड्डे दुरुस्तीसाठी देण्यात येणार असल्याची भूमिका जिल्हाध्यक्ष सुनिल भोंगाडे यांनी व्यक्त केली.या आंदोलनामध्ये ज़ितेश राणे, कैलास भेलावे , निखिल गजभीये , राहुल खोब्रागडे , रामकृष्ण गौतम , गौतम डाहाट , तिलक लिल्हारे , शंकर भोगाडे, संतोष वैद्य , ऊमेश लांजेवार, बाबा टेंभरे , कपुर भोगांडे, बालू गन्द्धे , संजय मेश्राम , शुभम हिरकने , लक्की विश्वकर्मा , विकेश फुंडे , मोरेश्वर भीवगढे , ललित बावंकर ,उत्तम यादव, निखिल यादव , हर्षद यादव,बी.डब्लू कटरे आदी सहभागी झाले होते.