बंदिवानांचे पुनर्वसन होणार-संवादपर्व कार्यक्रम

0
10

भंडारा,दि.06 : कारागृहात बंदिवान असणाºया व्यक्तीसाठी शासनातर्फे विविध सोयी सुविधा व सवलती पुरविल्या जातात. बंद्यांचे मानवी हक्क, शिक्षा, तडजोड, शेती व्यवसाय, बंद्यांचे गाºहाणे ऐकणे, आरोग्य सुविधा, समुपदेशन, योगाभ्यास, शेतीपूरक जोडधंदे व उद्योग व्यवसाय प्रशिक्षण आदि योजना कारागृहात राबविल्या जातात. या योजनांचा बंदीवानांनी लाभ घेऊन आपले जीवन सुकर करावे, असे आवाहन जिल्हा कारागृह अधीक्षक अनुप कुमरे यांनी केले.
जिल्हा कारागृह येथे जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आयोजित संवादपर्व कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा माहिती अधिकारी रवी गीते हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तुरुंगाधिकारी रमेश मेंगळे, सुनिलदत्त जांभुळे आदी उपस्थित होते.यावेळी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेवर आधारित ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. संवादपर्व हा महत्वाचा कार्यक्रम असून त्याद्वारे शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहचविण्यास मदत होते. कारागृहात वृत्तपत्र वाचनाअभावी शासनाच्या योजनेची माहिती होत नाही. त्यासाठी हे संवादपर्व उपयुक्त आहे. बंदिवानाच्या पुनर्वसनाच्या अनेक योजना शासनाने तयार केल्या असून पुनर्वसनासाठी शासन सदैव प्रयत्नशील आहे, असे ते म्हणाले.