सौंदड येथील पशुवैद्यकीय दवाखाना वार्यावर

0
37

सडक अर्जुनी,दि.06(विशेष प्रतिनिधी): ग्रामीण भागातील पशुपालकांना त्यांच्या पशुंवर वेळीच उपचाराची सोय व्हावी. यासाठी शासनाने पशुवैद्यकीय दवाखाने सुरू केले. मात्र तालुक्यातील सौंदड येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी व कर्मचाºयांची पद गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त असल्याने वर औषधांचा अभावाने हा दवाखाना केवळ नाममात्र ठरला आहे.या ठिकाणच्या डाॅक्टरला मात्र जिल्हा मुख्यालयी ठेवून ग्रामीण भागातील जनतेला सेवेपासून वंचित ठेवण्यात येत आहे.
येथील पशुवैद्यकीय दवाखान्याला शासनाने २०१२-१३ मध्ये सर्वोत्कृष्ठ कार्य पुरस्कार तर २०१४ मध्ये राज्य पुरस्काराने सम्मानित केले. मात्र यानंतरही सध्या पशुपालकांना येथे वैद्यकीय अधिकारी व औषधे उपलब्ध राहत नसल्याने विविध अडचणीना तोंड द्यावे लागत आहे. शासनाच्या उदासीन धोरणामुळे पशुपालकांना खाजगी डॉक्टरांची मदत घ्यावी लागत आहे. परिणामी गोरगरीब पशुपालकांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे. येथील पशु वैद्यकीय दवाखान्यात कार्यरत पी.पी. मारगाये यांची पाच महिन्यापूर्वी सेवानिवृत्त झाले. त्यांनतर त्यांचा प्रभार पर्यक्षेकाकडे देण्यात आला. मात्र दोन महिन्याचा कालावधी लोटूनही ते येथे रूजू झाले नाही. त्यामुळे येथे जनावरांना उपचारासाठी घेऊन येणाºया पशुपालकांची गैरसोय होत आहे. शेंडा कोयलारी येथे कार्यरत नरेश कुंभारे पशुधन पर्यवेक्षक यांना सौंदड येथील दवाखान्याचे अतिरिक्त प्रभार देण्यात आला. शेंडा कोयलारी परिसरातील १० गावे त्यांच्याकडे असल्यामुळे सौंदड येथे ते आठवड्यात केवळ तीन दिवस येतात. सौंदड, राका पिपरी, पळसगाव, सावंगी, ब्राम्हणी, बोपाबोडी, फुटाळा, भद्दयाटोला, श्रीरामनगर अशी दहा गावे असून जवळपास ६५०० अशी जनावरांची संख्या आहे.