गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण भागात निवडणुकीची रणधुमाळी

0
62

सुरेश भदाडे
गोंदिया,दि.६- ग्रामीण संसद समजल्या जाणाèया ग्रामपंचायतीचा बहुप्रतिक्षित कार्यक्रम जाहीर होताच गोंदिया जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीला रंग चढला आहे. यावर्षी सरपंच थेट जनतेतून निवडला जाणार असल्याने गावागावातील हौसीटौसी नेत्यांना चांगलेच स्फुरण चढल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सदस्यपदांपेक्षा सरपंच कोण होणार, कोण कोणाची जिरवणार,अशा चर्चांनी सध्या वेग घेतला आहे. सरपंचपदाची निवड थेट जनता करणार असली तरी या निवडणुकीत राजकीय पक्षांच्या बोधचिन्हांचा वापर करण्यात येणार नाही. मात्र, ग्रामीण भागात आपल्या पक्षाची ताकद वाढविण्यासाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. परिणामी, यावेळी या निवडणुकीत चांगलीच उलाढाल होण्याची शक्यता मात्र बळावली आहे. उल्लेखनीय म्हणजे सरपंचपदासाठी पहिलांदाच ७वी पासची अट लावण्यात आली आहे.
ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील मुदत संपणाèया एकूण ३४८ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीचे रणqशग फुंकल्या गेले आहे. राज्याच्या निवडणूक आयोगाने येत्या आक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात मुदत संपणाèया या आठ तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम गेल्या १ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आला. या निवडणुकीची नोटीस स्थानिक तहसीलदारांमार्फत येत्या १४ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. निवडणुकीचा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. नामनिर्देशन दाखल करण्याचा दिनांक २२ ते २९ सप्टेंबर (सुटीचे दिवस वगळून), नामनिर्देशन पत्राची छाननी ३ ऑक्टोबर रोजी,नामनिर्देशन मागे घेण्याचा दिनांक ५ ऑक्टोबर, उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करणे व चिन्ह वाटप ५ ऑक्टोबर , मतदान १४ऑक्टोबर आणि मतमोजणी १६ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
यावर्षी पहिल्यांदाच सरपंच थेट निवडला जाणार असल्याने यावेळी मतदाराला सदस्य आणि सरपंचासाठी वेगवेगळे मतदान करावे लागणार आहे. या निवडणुकीत प्रत्येक मतदाराला किमान तीन व कमाल चार मते देण्याचा अधिकार राहील. निवडणुकीचा आचारसंहिता निवडणूक असलेल्या भागात गेल्या १ सप्टेंबर पासून लागू करण्यात आली असून ज्या तालुक्यातील ५० टक्केच्या वर निवडणुका असतील त्या संपूर्ण तालुक्यातील ग्रामीण भागात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. यावेळी मतदानासाठी सरपंच पदासाठी फिक्कट निळी मतपत्रिका, अनुसूचित जातीसाठी फिक्कट गुलाबी, अनुसूचित जमातीसाठी फिक्कट हिरवी, नामाप्रसाठी फिक्कट पिवळी तर खुल्या प्रवर्गासाठी पांढèया मतपत्रिकेचा वापर करण्यात येणार आहे. यावर्षी उमेदवारांसाठी निवडणूक खर्चातसुद्धा वाढ करण्यात आली आहे.
गोंदिया जिल्ह्यात निवडणूक जाहीर झालेल्या ग्रामपंचायती या प्रमाणे आहेत.
देवरी तालुका ( ग्रा.पं.२५)
आलेवाडा, आमगाव, भागी/शि., चिचेवाडा, चिचगड,डवकी, ढिवरीनटोला,डोंगरगाव,फुक्कीमेटा, गडेगाव, हरदोली, जेठभावडा, केशोरी, मगरडोह, म्हैसूली, मुल्ला, मुरपार, नकटी, ओवारा, पलानगाव,पळसगाव/चु.,पिपरखारी,पुराडा, शेडेपार, वांढरा
तिरोडा (७४)
अर्जूनी, अत्री, बघोली, बरबसपुरा, बयवाडा, बेलाटी/बु. भजेपार, भंबोडी, भिवापूर, बिहीरीया, बिरोली, बिरसी, बोदा, बोरा, बोरगाव, चांदोरी/बु., चांदोरी/ खु, चिखली, चिरेखनी, चोरखमारा, चुरडी, डोंगरगाव, गांगला, गराडा, घाटकुरोडा, गुमाधावडा, इंदोरा/ बु, इंदोरा/खु,, जमुनिया, काचेवानी, करटी/बु, करटी/खु., कवलेवाडा, केसलवाडा, खडकी, खैरवोडी, खैरलांजी, खमारी, खुरकुडी,कोडेलोहारा, कोयलारी, लाखेगाव, लेदडा, माल्ही,मलपुरी, मांडवी, मंगझरी,मनोरा, मरारटोला, मारेगाव, मेंंढा, मेंदीपूर, मुंडीकोटा,मुंडीपार, मुरमाडी, मुरपार, नवेगाव/खु., निमगाव, पांजरा, परसवाडा, पिपरिया, पुजारीटोला, सालेबर्डी, सरांडी, सावरा, सेजगाव, सिल्ली, सितेपार, सोनेखारी, सुकडी, ठाणेगाव, विहीरगाव, वडेगाव, येडमाकोट,
अर्जूनीमोर (४०)
अरूणनगर, बाक्टी, भिवखिडकी, बोदरा/ दे, बोडदे/क, धाबेटेकडी, गौरनगर, इटखेडा, खांबी, खामखर्रा, कोरंभी,महालगाव, मोरगाव, मुंगली, नवेगावबांध, निमगाव, qपपळगाव, सिरोली, सोमलपूर, तुकुमनारायण, विहीरगाव/ब., वडेगाव/ब., येरंडी/दे., अरततोंडी, बुधेवाडा,चान्ना/बा. चापटी, दाभना, गोठणगाव, गुढरी, कान्होली, कोहलगाव, नवनीतपूर, रामनगर, रामपुरी, सुकडी, ताडगाव, वडेगाव स्टे., येरंडी दर्रे, झरपडा,
आमगाव (३५)
बघेडा, बाम्हणी, भजियापार, भोसा, बोदा, बोरकन्हार, बोथली, बुरडीटोला, दहेगाव, धामनगाव,डोंगरगाव, फुक्कीमेटा, गिरोला, गोरठा, जवरी, करंजी, कातुर्ली, कवडी,खुर्शिपार, खुर्शीपारटोला, किडंगीपार, मानेगाव, मोहगाव, नंगपुरा, ननसरी, पानगाव, पाऊलदौना, पिपरटोला, सावंगी, सितेपार, सुपलीपार, सुरकुडा,टाकरी, टेकरी,तिगाव
सडकअर्जूनी (४३)
बाम्हणी ख., बाम्हणी स., भुसारीटोला, बोपाबोडी, बोथली, चिचटोला, चिरचाडी, डव्वा, धानोरी, डो्गरगाव ख., डुग्गीपार, डुंडा, फुटाळा, घोटी, गिरोला, गोंगले, गोपालटोली, हेटीगिरोला, कनेरी राम, कन्हारपायली, खाडीपार, खडकी दो., खजरी, खोडशिवणी, कोहळीटोला, कोहमारा, म्हसवानी, मुंडीपार ई, मुरपार राम, पळसगाव ड., पांढरवानी, परसोडी, पाटेकुर्रा, पुतळी,राजगुडा, रेंगेपार द., सौंदड,सावंगी, शेंडा, सितेपार, तिडका, उशिखेडा, वडेगाव
सालेकसा(३२)
आमगाव खु., बाम्हणी, भजेपार, बिजेपार, qबझली, बोदलबोडी, दरबडा, दर्रेकसा, धानोली, गांधीटोला, गिरोला, गौर्रे, जमाकुडो, कडोतीटोला, कहाली, खेडेपार, खोलगड, कोसमतर्रा,लटोरी, लोहारा, मक्काटोला, नान्हवा, नवेगाव, निंबा, पांढरवानी, पाथरी, पिपरीया, रौंढा, सोनपुरी, तिरखेडी, टोयागोंदी, झालीया,
गोरेगाव(२९)
आंबेतलाव, बबई, बघोली, बाम्हणी, भडंगा, बोटे, दवडीपार, डव्वा, गणखैरा, घुमर्रा, हौसीटोला, हिरडामाली, कलपाथरी,कमरगाव, कटंगी बु.,कुèहाडी, मोहाडी,मोहगाव ति., मुंडीपार, मुरदोली, पालेवाडा, पलखेडा, qपडकेपार, पुरगाव, सटवा, सिलेगाव, तिमेझरी, तुमखेडा बु., झांजीया
गोंदिया (७१)
अदासी, आंभोरा, अर्जूनी, आसोली, वडेगाव, बरबसपुरा, बटाणा,बिरसी दास., बिरसी का., चारगाव, चुलोद,दांडेगाव, डांगोरली, दासगाव बु., दासगाव खु., दत्तोरा, दवनीवाडा, देवरी, देऊटोला, ढाकणी, धामनेवाडा, धामनगाव, गुदमा, इर्री, जब्बारटोला, कामठा, कारंजा, कारूटोला, कटंगीकला, खळबंदा, खातीया, किन्ही, कुडवा, लहीटोला, लंबाटोला, लोहारा, महालगाव, मजितपुर, माकडी, मोरवाही, मुंडीपार धापे., मुंडीपार खु., मुरदाडा, मुरपार, नंगपुरा मुर्री, नवरगाव कला, नवेगाव धापे, नवरगाव खु, निलागोंदी, निलज, पांढराबोडी, पांजरा, पारडीबांध, qपडकेपार, रायपूर, रजेगाव, रापेवाडा, रतनारा, सहेसपुर, सतोना, सिरपूर, शिवनी, सोनपुरी, तांडा, तेढवा, तुमखेडा खु., उमरी, वळद, झालुटोला, झिलमिली.