गोंदिया व तिरोड्यात अंडरग्राऊंड व एबी केबलने होणार वीज पुरवठा

0
12

गोंदिया,दि.08 : वीज चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी महाराष्ट्र वीज वितरण कंपनी आता अंडरग्राऊंड (भूमिगत) व एबी (एरीयल बंच) केबलने वीज पुरवठा करणार आहे. यासाठी केंद्र शासनाच्या एकात्मिक उर्जा विकास योजनेंतर्गत (आयपीडीएस) जिल्ह्यातील गोंदिया व तिरोडा या दोन शहरांची निवड केली आहे. यात गोंदियासाठी १८ कोटी ३८ लाख तर तिरोड्यासाठी नऊ कोटी ८२ लाख अशी एकूण २८ कोटी २० लाख रूपयांची तरतूद केली आहे. वीज चोरीच्या घटनांवर घालण्यासाठी व उघड्यावर वीज पुरवठा करणाºया वाहिन्यांमुळे अपघात होऊ नये, यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने महावितरणने पाऊले उचलली आहे. ज्या ठिकाणी अंडरग्राउंड केबल टाकता येणार नाही, अशा भागांत एबी केबलच्या (एरियल बंच) माध्यमातून वीज पुरवठा करणार आहे. केंद्र शासनाच्या एकात्मिक ऊर्जा विकास योजनेंतर्गतकंत्राटदारांना एप्रिल महिन्यात कार्यादेश देण्यात आले असून येत्या दिड वर्षात हे काम पूण करायचे आहे.
या योजनेंतर्गत उच्चदाब वाहिनीसाठी गोंदिया शहरात ४ किमी. तर तिरोडा शहरात ३ किमी. चे नियोजन करण्यात आले आहे. तर लघुदाब वाहिनीसाठी अंडरग्राऊंड अंतर्गत गोंदियात १० किलोमीटरचे नियोजन करण्यात आले आहे. गोंदियात १४ किलोमीटरचे एरीयल बंच केबल नियोजन करण्यात आले आहे.