नाथजोगी समाजाच्या कुटूंबीयांसाठी ९० लाख रूपयांची आवास योजना मंजूर

0
12

गोंदिया,दि.11- तालुक्यातील तांडा येथील नाथजोगी समाजातील कुटूंबीय गेल्या अनेक वर्षापासून कच्च्या घरांमध्ये अत्यंत दयनीय अवस्थेत वास्तव्य करीत आहेत. त्यांचे जीवन उंचाविण्यासाठी व त्यांच्या निवासासाठी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी प्रयत्न केल्यामुळे राज्य शासनाने नाथजोगी समाजातील कुटूंबीयांच्या निवासासाठी ९० लाख रूपये मंजूर केले आहेत.नाथजोगी समाजाकडे काही जमीन उपलब्ध असल्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली १ फेबु्वारी रोजी झालेल्या बैठकीत ५८ लाख रूपयांचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता. या संदर्भात आ.गोपालदास अग्रवाल यांना माहिती मिळताच त्यांनी शासन स्तरावर ङ्क्नत ५ गुंठयाची अट रद्द करून समाज भवनासहित संपूर्ण ९० लाख रूपयाच्या लागतीचा प्रस्ताव शासनाकडे पुन्हा सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाèयांना दिले होते. या संदर्भात जिल्हाधिकाèयांनी आ.अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेऊन नवीन प्रस्ताव समाज भवनासहित शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.

एवढेच नाही तर या बैठकीत लाभाथ्र्यांची संख्या २० वरून ४० करण्याचाही निर्णय घेण्यात आला. आता लवकरच समाज कल्याण अधिकारी जिल्हाधिकाèयांमाङ्र्कत सदर प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठीशासनाकडे सादर करणार आहेत. यावेळी आ.अग्रवाल म्हणाले,सर्व नाथजोगी समाजातील कुटूंबीय समाजातील अविभाज्य घटक असून त्यांचे जीवनमान उंचाविणे हे त्यांचे कर्तव्य आहे. सद्यास्थितीत २० नाथजोगी कुटूंबीयांना घरकुल मिळाल्यानंतर आगामी वर्षात सर्व नाथजोगी कुटूंबीयांना घरकुल मंजूर करून देण्याचा विश्वास त्यांनी व्य्नत केला. नाथजोगी समाजाच्या हितासाठी आ.अग्रवाल यांच्याकडून करण्यात आलेल्या प्रयत्नामुळे नाथजोगी समाजातील ग्रा.पं.सदस्य तांबू, सरपंच निर्मला बहेकार, रोहिणी रहांगडाले, जि. प.सदस्य विठोबा लिल्हारे, रामसिंह परिहार, भास्कर रहांगडाले, माजी सरपंच उके, उपसरपंच तांडेकर, उत्तम खांडेकर यांनी आ.अग्रवाल यांचे अभिनंदन केले आहे.