आ. अग्रवालांच्या पुढाकाराने 65 रोजंदारी कर्मचार्यांचा स्थायी होण्याचा मार्ग मोकळा

0
12

गोंदिया,दि.12 : येथील नगरपरिषदेमध्ये कार्यरत असलेले 187 अस्थायी रोजदांरी सफाई कामगार स्थायी होण्याच्या आशेवर गेल्या २०-२५ वर्षांपासून  काम करीत होते.त्यांच्या या कष्टाचे फलीत लवकरच मिळणार आहे. शैक्षणिक अर्हतेच्या आधारावर सुमारे ६५ कर्मचार्यांना स्थायी करण्याची प्रक्रिया येत्या १५ दिवसांत होणार असून उर्वरितांना मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आस्थापना खर्चाच्या आधारावर कायम केले जाणार आहे.यासाठी गोंदियाचे आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या पुढाकाराने नगरविकास मंत्रालयाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
नगर परिषदेतील रोजंदारी कर्मचाºयांना स्थायी करण्याच्या मागणीसाठी युनियनचे अध्यक्ष जहीर अहमद मागील कित्येक वर्षांपासून प्रयत्नशील आहेत. सन २००६ पासून आमदार गोपालदास अग्रवाल यांनी अहमद यांच्या मागणीला घेऊन राज्य शासनाच्या स्तरावर आपले प्रयत्न सुरू ठेवले आहेत. रोजंदारी कर्मचाºयांच्या या मागणीला घेऊन ७ सप्टंबेरला मुंबई मंत्रालयात नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांनी विशेष सभा बोलाविली होती.
आमदार अग्रवाल, न.प.प्रशासन संचालक विरेंद्र सिंह, मुख्याधिकारी चंदन पाटील, कर्मचारी युनियनचे अध्यक्ष अहमद यांच्यासह संबंधीत अधिकाºयांच्या उपस्थितीत रोजंदारी कर्मचार्यांचा विषय आमदार अग्रवाल यांनी मांडला. यावर जे रोजंदारी कर्मचारी १० व १२ वी उत्तीर्ण आहेत अशा सुमारे ६५ कर्मचार्यांना प्रथम टप्प्यात १५ दिवसांच्या आत स्थायी करण्याची कारवाई सुरू केली जाईल. तर उरलेल्या सुमारे १२२ कर्मचाºयांना आस्थापना खर्चाच्या आधारावर मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून स्थायी करण्याची कारवाई करण्याचा निर्णय आमदार अग्रवाल यांच्या मागणीवरून घेण्यात आला. विशेष म्हणजे, आमदार अग्रवाल यांनी नगर परिषदेतील अधिकाºयांच्या अभावामुळे कारभार अव्यवस्थीत झाल्याचा मुद्दा बैठकीत मांडत संवर्गातील ४० पैकी ३३ पदे रिक्त असून त्यांना भरणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगीतले. गोंदिया शहराला ‘अमृत’ योजनेत समाविष्ट करण्यात आल्याने योजनेच्या क्रियान्वयनासाठी रिक्त पदे भरावी यासाठीही ते प्रयत्नरत असल्याचे सांगीतले.