‘त्या’ बिबट वाघिनीने दिले गोंडस पिलांना जन्म?

0
12

साकोली,दि.12-सानगडी परिसरातील बिबट वाघिनीने जगल परिसरात दोन ते तीन पिलांना जन्म दिल्याचे सरपनासाठी जंगलात गेलेल्या महिलांना दिसून आल्याची चर्चा संपूर्ण परिसरात वाèयासारखी आहे. ही वाघीन गरोदर अवस्थेत परिसरात अनेकदा नागरिकांनी पाहिली आहे. त्यामुळे या घटनेवर विश्वास दर्शविला जात आहे. मात्र, वनविभाग याबाबत संवेदनशिल दिसत नसल्याने बिबट वाघिनीने पिलांना जन्म दिला किंवा नाही, याची खात्री पटू शकली नाही. वनविभागाच्या अधिकाèयांनी प्रकरणी सतर्क होण्याची गरज असून अन्यथा या परिसरात मानव व वन्यजीव संघर्ष वाढण्याची भिती व्यक्त होतआहे. तालु्नयातील सानगडी उपवन क्षेत्र अंतर्गत झाडगाव शिवारात गेल्या महिन्याभरापासून एका गरोदर बिबट वाघिणीने धुमाकुळ घालून लोकांत दहशत पसरविली होती. याविषयीची माहिती लोकांनी सानगडी वनविभागाला दिली होती. त्यावेळी वनविभागाच्या कर्मचाèयांनी रात्रीला झाडगावग्रामपंचायती जवळील हनुमान मंदिरात जागली(गस्त) सुरु केली. दरम्यानच्या काळात कर्मचाèयांना या वाघिनीने अनेकदा दर्शन दिले.