आचार संहिता असतांनाही अर्जुनीत रस्ता बांधकाचे भुमिपूजन

0
6
 गोंदिया,दि. १२: तिरोडा तालुक्यातील अर्जुनी ग्रामपंचायत अंतर्गत महात्मागांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ६ लाख ४० हजार रूपये किमतीचे एक रस्ता बांधकाम मंजूर झाले होते. मात्र १ सप्टेंबर रोजी निडणुक कार्यक्रम घोषित झाल्याने आचार संहिता लागली. मात्र भाजपाच्या एका ग्रा.प. सदस्याने आपला तोरा दाखवित ते काम खासदार फंडाचे असल्याचे सांगत त्याकामाचे भुमिपूजन ३ सप्टेंबर रोजी केल्याने  या सदस्याने व पर्यायाने ग्रामपंचायतीने आचार सहितेचा उल्लघंन केल्याची तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आली आहे.त्या तक्रारीच्या आधारे मुकाअ संबधितावर काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे. याप्रकरणामुळे गावातील वातावरण चांगलेच चिघळले आहे.
सवितर असे की, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगारहमी योजनेतर्गत अर्जुनी ग्रामपंचायत येथे सिंमेट रस्ता बांधकाम मंजुर झाले. याकामासाठी ६ लाख ३९ हजार ९९८ रूपयाचा निधी मंजुर असून कामाला प्रशासकिय मान्यता व कार्यारंभ आदेश ही प्राप्त झाला होता. अश्यातच १ सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम  जाहिर झाल्याने नविन कामे सुरू करता येत नाही. असे आदेश प.स. तिरोडा मग्रारोहयो विभागाच्या वतीने ग्रामपंचायतसह यंत्रणेच्या अधिकार्यांने दिली. मात्र एका सदस्याने आपल्या अधिकाराचा तोरा ्दाखवित या कामाचे भुमिपुजन ३ सप्टेंबर रोजी उरकुन हे काम खासदार निधीचे असल्याचे फलक लावले. हा प्रकार गावातील काही नागरिकांच्या लक्षात येताच मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रकार करुन आदर्श आचार संहीतेचा उल्लंघन केल्याचे म्हटले आहे.त्यासंबधीचे निवेदन गावातील  पोलेश्वर भगत, चंद्रकुमार भगत, अशोक पटले, आशिष बन्सोड, जितेश गणविर, जयराम पटले, रविकुमार पटले, चरनदास साखुरे, पंकज ठाकरे, आदीनी मुख्यकार्यपालन अधिकारी जि.प. गोंदिया, खंडविकास अधिकारी तिरोडा, उपमुख्यकार्यकारी अधिकारी (पंचायत, रोहयो) गोंदिया, निवडणुक निर्णय अधिकारी गोंदिया, जि.प.सदस्य वैâलाश पटले, आदीना दिले आहे.