हातगाव कांबी येथील बलात्कार घटनेचा निषेध- नाव्ही समाजाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

0
23
गोंदिया,दि.12 : अहमदनगर जिल्ह्यातील हातगाव कांबी येथील नाभिक समाजाच्या एका अल्पवयीन मुलीवर २८ ऑगस्ट रोजी शंभाजी शिवाजी भराट (पाटील) नामक नराधमाने केलेल्या बलात्कार घटनेचा  संत सेनाजी मंदिर समितीच्या गोंदियाच्यावतीने निषेध नोंदवून आरोपीला कठोर शिक्षा देण्यासंबधिचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे. ११ सप्टेंबर रोजी संत सेनाजी मंदिर येथे दुपारी ३ वाजता निषेध सभा घेऊन आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी शिष्टमंडळाने  निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदन सादर केले. याप्रसंगी जिल्हा युवाध्यक्ष संजय चन्ने, उत्सव समिती अध्यक्ष सुशिल उमरे, बार्बर असोसिएशनचे सचिव दुलीचंद भाकरे, नाभिक आरक्षण समिती अध्यक्ष अमोल लांजेवार, उपाध्यक्ष प्रदिप लांजेवार, नाभिक आरक्षणचे संपर्क प्रमुख  जितेंद्र फुलबांधे, मनिष उरकुडे, महेश लांजेवार, लक्ष्मीप्रसाद मेश्राम हे उपस्थित होते.