सामर्थ्य, आत्मविश्वास, एकाग्रता, आणि शक्ती यांचे संगम म्हणजे विवेकानंद – अरुण नेटके

0
14
लाखनी,दि.12- १८६३ ते १९०२ अवघे ३९ वर्ष आयुष्य जगलेले विवेकानंद भारताचे तत्वज्ञान जगात प्रतिथित केले. रवींद्रनाथ टागोर म्हणतात की, ज्यांना भारत समजून घ्यायचे आहे त्यांना विवेकानंद समजावे लागेल. श्रीपादश्रीवल्लभ या सागरातील दगडावर बसून ७२ तास ध्यान केल्यानंतर खरे विवेकानंद तत्वज्ञान सांगणारे आणि जगात धर्माचे प्रचार झाले. शिकागो येथील १८६३ च्या भाषणात जगाचे लक्ष त्यांनी वेधून टाकले. या दिवसाचे महत्त्व विश्व हिंदू परिषदेचे प्रांत संघटन मंत्री अरुण नेटके यांनी सांगितले.
 राष्ट्रीय शिक्षण संस्था लाखनी द्वारा संचालित विवेकानंद सार्वजनिक वाचनालय लाखनी तथा राणी लक्ष्मीबाई कन्या विद्यालय लाखनी यांच्या संयुक्त विद्यमाने राणी लक्ष्मीबाई कन्या विद्यालयाच्या प्रांगणात शतकोत्तर रौप्य दिनानिमित्त व्याख्यानाचं आयोजन करण्यात आले होते.
अध्यक्षस्थानावरून मधुकर लाड यांनी विवेकानंद आणि भारतीय शिक्षण पद्धती यावर प्रकाश टाकला. विवेकानंद वाचनालयातर्फे विवेकानंद जीवन ग्रंथ प्रदर्शन उपलब्ध केले होते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सदस्य मधूकर लाड, प्रमुख  वक्ते अरूण नेटके, छबीलाल रहांगडाले, विद्यालयाचे पर्यवेक्षक भाउराव चेटुले, गोवर्धन शेंडे, ऍड कोमल गभणे, अनिल नायर, रा गिरी, अजिंक्य भांडारकर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिशा गद्रे, प्रास्ताविक अजिंक्य भांडारकर आणि आभार पर्यवेक्षक भाऊराव चेटूले यांनी मानले.