नागपूरमार्गे दोन विशेष रेल्वेगाड्या

0
9

नागपूर,दि.12 – नवरात्री, दसरा व दिवाळीत रेल्वेगाड्यांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन प्रवाशांच्या सुविधेसाठी अतिरिक्त पूजा स्पेशल रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. नागपूरमार्गे अतिरिक्त तीन विशेष रेल्वेगाड्या धावणार आहेत.

संतरागाछी-राजकोट वातानुकूलित सुपरफास्ट पूजा स्पेशल ट्रेन २२ सप्टेंबर ते २६ नोव्हेंबरदरम्यान एकूण १० फेऱ्या करणार आहे. या गाडीमुळे प्रवाशांची सुविधा होणार असली  तरी त्यासाठी विशेष शुल्क मोजावे लागणार आहे. ०२८३४ संतरागाछी-राजकोट विशेष रेल्वे  २२ सप्टेंबर ते २४ नोव्हेंबरदरम्यान प्रत्येक शुक्रवारी रात्री ९.०५ वाजता संतरागाछी येथून रवाना होऊन शनिवारी दुपारी ३.०५ वाजता नागपूर स्थानकावर येईल आणि रविवारी दुपारी १.४५ वाजता राजकोट स्थानक गाठेल.०२८३३ राजकोट-संतरागाछी सुपरफास्ट ट्रेन २४ सप्टेंबर  ते २६ नोव्हेंबरदरम्यान प्रत्येक रविवारी रात्री १०.२० वाजता राजकोट येथून रवाना होऊन सोमवारी रात्री १० वाजता नागपूर स्थानकावर येथील आणि मंगळवारी दुपारी ४.३५ वाजता संतरागाछी स्थानक गाठेल.या गाडीला गोंदिया येथे थांबा देण्यात आलेला आहे.
याचप्रमाणे पुणे- संतरागाछी साप्ताहिक वातानुकूलित पूजा स्पेशल ट्रेन ७ ऑक्‍टोबर ते २७ नोव्हेंबरदरम्यान एकूण ८ फेऱ्या करणार आहे. ०२८२२ संतरागाछी-पुणे विशेष ट्रेन ७ ऑक्‍टोबर ते २५ नोव्हेंबरदरम्यान प्रत्येक शनिवारी सायंकाळी ६.३० वाजता संतरागाछी येथून रवाना होऊन रविवारी सकाळी ११.१५ वाजता नागपूर स्थानकावर आगमन होईल आणि सोमवारी मध्यरात्री २.४५ वाजता पुणे स्थानक गाठेल. ०२८२१ पुणे-संतरागाछी साप्ताहिक ट्रेन ९ ऑक्‍टोबर ते २७ नोव्हेंबरदरम्यान प्रत्येक सोमवारी १०.३० वाजता पुणे स्थानकावरून रवाना होऊन मंगळवारी मध्यरात्री १.२० वाजता नागपूर स्थानकावर दाखल होईल आणि मंगळवारी सायंकाळी ६.१५ वाजता संतरागाछी स्थानक गाठेल.तर या गाडीला दुर्ग नंतर सरळ नागपूरचा थांबा देण्यात आला आहे.