आ.रहागंडालेंनी दिले मुख्यमंत्र्यांना निवेदन,पिकाचे करा पंचनामे

0
12

गोंदिया,दि.13- गोंदिया-भंडारा जिल्ह्यात गेल्या काही वर्षाचा काळ बघितल्यास यावर्षीची परिस्थिती ही भयावह असल्याने व पाऊसही कमी पडल्याने धानपिकाची रोवणी होऊ शकली नाही.त्यातच कमी पावसामुळे रोवणी केलेले पीक ही हातून जाऊ लागल्याने दोन्ही जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने दुष्काळग्रस्त गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील शेतीचे त्वरीत पंचनामे करुन शेतकर्यांना मदत करण्यासंबधीचे निवेदन तिरोडा-गोरेगाव मतदारसंघाचे आमदार विजय रहागंडाले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंगळवाल दिले.यावेळी त्यांच्यासोबत गोंदियाचे पालकमंत्री राजकुमार बडोले, तुमसर मोहाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार चरण वाघमारे, देवरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय पुराम, माजी आमदार भैरसिंह नागपूरे,रेखलाल टेंभरे उपस्थित होते.

निवेदनात अल्प पावसामुळे दुष्काळी परिस्थिती असलेल्या  गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील शेतीचे त्वरित पंचनामे करून त्यावर उपाय योजना करण्यात यावे. शेतक-यांना उडीद चना पोपट मुंग इ कडधान्यांचे बियाणे पुरविण्यात यावे, गुरांकारीता चारा छावणी तय्यार करण्यात यावी, MREGS च्या कामांचे नियोजन करून निधी उपलब्ध करण्यात यावे, शेतक-यांना अनुदानात अन्नपुरवठा करण्यात यावा, व्यक्तिश काढलेल्या पिक विम्याचा लाभ देण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश होता.