जबरानजोत धारकांचा मोर्चा कचेरीवर धडकला

0
8

ब्रह्मपुरी,दि.15 : देशभर शेतकºयांच्या आत्महत्या वाढतच आहेत. उद्योगपतींना एन.पी.ए.च्या नावाखाली प्रचंड कर्जमुक्ती दिली जाते. मात्र शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी नाकारली जाते. शेतकºयांच्या पिकविलेल्या मालाला हमीभाव मिळत नाही. देशात स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू होत नाही. कसत असलेल्या वनजमिनी जबरानजोत धारकांच्या नावाने केल्या जात नाही. शासनाच्या या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी बुधवारी शेतकरी, शेतमजूर, जबरानजोत धारकांचा मोर्चा
ब्रह्मपुरी एसडीओ कार्यालयावर धडकला.
महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने ७ ते १६ सप्टेंबर या कालावधीत राज्यात संघर्ष यात्रा काढली आहे. विदर्भात ७ सप्टेंबरपासून पारशिवनी नागपूर पासून या यात्रेला सुरूवात झाली असून १३ सप्टेंबर रोजी ब्रह्मपुरी शहरात यात्रा पोहचताच हजारो शेतकरी, शेतमजूरांनी हातात झेंडे घेऊन शिवाजी चौकात दुपारी ३.०० वाजता यात्रेचे स्वागत केले.
तत्पुर्वी महाराष्ट्र राज्य किसान सभा शाखा ब्रह्मपुरीच्या वतीने शेतकरी, शेतमजूर व जबरानजोत धारकांच्या विविध प्रलंबित मागण्यांना घेऊन किसान नेते विनोद झोडगे, नामदेव नखाते, श्रीधर वाढई, देवराव खानखुरे, कुंदा कोहपरे, बाळकृष्ण दुमाने, सुधीर खेवले, मनोहर आदे, श्रीराम हजारे, दिवाकर झाडे, मिलींद मेश्राम, राजू मोटघरे यांच्या नेतृत्वात हजारो शेतकरी शेतमजूरांनी हुतात्मा स्मारक येथून मोर्चा काढला.