१.२२ लाख दुधाळू जनावरांना ‘युनिक कोड’

0
14

गोंदिया,दि.18 : जनावरांची ओळख करण्यासाठी शासनाने पशूसंजीवनी योजनेंतर्गत दुधाळू जनावरांना युनिक कोड देण्याची योजना सुरू केली आहे. ही मोहीम सुरू झाली असून जिल्ह्यातील सर्व दुधाळू जनावरांना हे युनिक कोड दिले जाणार आहेत.गोंदिया जिल्ह्यात एक लाख २२ हजार दुधाळू जनावरे आहेत. त्या जनावरासंदर्भात सर्वच माहिती ‘ई-हट’ या पोर्टलवर टाकली जाणार आहे. १२ अंकी असलेला युनिक कोडचा टॅग प्रत्येक दुधाळू जनावरांना दिला जाणार आहे. गोंदिया जिल्ह्यात पहिल्या टप्यात २५ हजार जनावरांना हे टॅग लावले जाणार असून हे टॅग जिल्ह्याला मिळाले आहेत.

या मोहीमेची प्रचार-प्रसिध्दी ज्या पध्दतीने पशुंसर्वधन विभागाने करायला हवी होती,ती झालेली नाही उलट काही अधिकारी आपलेच छायाचित्र काढून आपल्या प्रसिध्दीसाठी काम करीत असल्याचे दिसून आले जेव्हा की शासनाने अधिकायाना प्रसिध्दीपासून दूर राहण्यासंबधी काही मार्गदर्शक तत्व ठरवून दिली आहेत. पहिल्या टप्यात दुधाळू गायी, म्हशींना टॅग लावून संगणकाद्वारे जनावर व पशूपालकांची माहिती अपलोड करणे सुरू आहे. आता पर्यंत गोंदिया जिल्ह्यातील २७३ जनावरांना हे युनिक कोड देण्यात आले आहेत.दररोज एक व्यक्ती कमीत-कमी पाच जनावरांना टॅग लावण्याचे उदिष्ठ विभागाकडून घालून देण्यात आले आहे.