एटापल्लीच्या चौकात लागले नक्षल्यांचे बॅनर

0
12

आलापल्ली ,दि. २२ : एटापल्ली येथील वन उपज नाक्यावरील शासकीय योजनांची माहिती प्रसिद्ध केल्या जाणा-या फलकावर अन्यायविरुद्ध कठोर युद्ध पुकारा व माओवादी संघटना स्थापना दिन २१ ते २७ सप्टेंबर साजरा करा, असा मजकुर लिहिलेले बॅनर लावल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.काल (दि. २१) रात्री च्या सुमाऱ्यास नक्षल्यांनी बॅनर लावले . या आठवड्यात गट्टा येथील भुसुरुंग स्फोट, पोलिस नक्षल चकमक, सुरजागड़ पहाड़ी परिसरात पोलिसांकडून शक्तिशाली स्फोटके निकामी करने व बॅनर-पोस्टर बाजीने तालुक्यात दहशत पसरली आहे.