तिरोडा तालुक्यात ‘स्वाईन फ्लू’ने तीन जण दगावले

0
17

तिरोडा,दि.26 : संसर्गजन्य असलेल्या स्वाईन फ्लूने आतापर्यंत तिरोडा तालुक्यातील तीन जण दगावले. तर एक संशयित रुग्ण आढळला. यामुळे तालुक्यातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.तिरोडा तालुक्यातील केसलवाडा, बिर्सी व चांदोरी येथे स्वाईन फ्लू ने तीन जण २४ सप्टेंबर रोजी दगावल्याची माहिती आहे. यामध्ये सरस्वता बाजीराव रार्घोते (५३) बिर्सी, दिलीप बाबूराव आदमने (४०) रा. चांदोरी व सुनिता अभिमन कुकडे (५५) रा.केसलवाडा यांचा समावेश आहे. स्वाईन फ्लूमुळे एकाच तालुक्यातील तीन जण दगावल्याची गोंदिया जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे. यामुळे तालुक्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.स्वाईन फ्लूने दगावलेली सरस्वता रार्घोते हिचा नातू नयन नंदकिशोर रार्घोते (२) बिर्सी हा संशयीत रुग्ण म्हणून आढळला असून त्याला डॉ. अग्रवाल यांच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिल्ह्यात स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.