पवार रास गरबा उत्सवात खा.पटोले व आ.रहागंडालेनी केली महाआरती

0
31

गोंदिया,दि.29- पवार प्रगतीशील मंचच्या  पवार सांस्कृतिक भवन कन्हारटोली येथे पवार नवयुवक समिती व नवरात्री रास गरबा समितीतर्फे आयोजित पवार रास गरबा  उत्सव समितीच्यावतीने गुरुवारला 5 हजार दिव्यांची महाआरती उत्साहात साजरी करण्यात आली.या महाआरतीसाठी भंडारा-गोंदियाचे खासदार नाना पटोले,तिरोडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय रहागंडाले,तिरोडा बाजार समितीचे सभापती डाॅ.चिंतामण रहागंडाले,डाॅ.वसंत भगत,भाजप शहर अध्यक्ष सुनिल केलनका,भालचंद्र ठाकूर,सुरेश पटले,प्रगतीशील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेश चव्हाण,सचिव किशोर भगत,सुरेश पटले,संजय रहांगडाले ,महिला समितीच्या छायाताई पटले,मंजुषा हरिणखेडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. पवार रास गरबा उत्सव समितीच्या युवकांनी पुढाकार घेऊन गेल्या काही वर्षापासून आयोजित या उपक्रमाला तरूणी,महिला व युवकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे. रास गरबा आयेजन समितीचे केतन तुरकर,पंकज पटले,संदीप बघेले,गौरव तुरकर,प्रतिक रहांगडाले,बाबा बिसेन,कुणाल बिसेन,दीपम देशमुख,जलज येळे,राहुल बिसेन,योगेश ठाकरे, नवयुवक समितीचे छत्रपाल चौधरी,गुलाब ठाकूर, संदीप रहांगडाले,सोनु येळे, अंकित बिसेन,देवेश गौतम, मुनेश अंबुले,प्रविण पटले,जयेश चव्हाण व इतर सदस्य परिश्रम घेत आहेत.रास गरबा सोबतच आयोजक मंडळाच्या वतीने पवार व्यापार मेळावा तसेच इतर उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याने उपस्थिताची गर्दी वाढत आहे.