बडनेरा शहरात शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा-आ.राणा

0
12

अमरावती,दि.29 :बडनेरा शहरातील नेताजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा १२ फुटी पूर्णाकृती पुतळा स्थापित करण्यात येणार आहे. यासाठी शंभर ज्येष्ठ नागरिकांची समिती स्थापन केली आहे, अशी माहिती बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत आ.रवी राणा यांनी दिली. यासाठी राणा हे त्यांच्या वेतनातून पुतळ्यासाठी १० लाख रूपये देणार असल्याचे बैठकीत स्पष्ट केले. यावेळी बडनेरा मतदारसंघातील विविध कामांचाही आढावा आ. रवी राणा यांनी घेतला. यावेळी बैठकीला जिल्हाधिकारी अभिजित बांगर, मनपा आयुक्त हेमंत पवार, मजीप्राचे कार्यकारी अभियंता एस.एम. कोपुलवार व अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
मजीप्रामार्फत एकदिवसाआड होत असणारा पाणीपुरवठा नियमित करावा, अशी सूचना त्यांनी केली. शहरातील अनेक भागात पाणी पोहोचत नसल्याने नागरिक पाण्यापासून वंचित राहत आहेत. पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईनमधील ब्लॉकेज दुरूस्त केले जात नाही. त्यामुळे नागरिकांना दूषित पाणी पिण्यासाठी वापरावे लागत आहे. त्यामुळे ज्या-ज्या ठिकाणी ब्लॉकेज आहेत. अशा ठिकाणी पाणी पुरवठा सुरळीत करावा, अशा सूचना आ. राणा व जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी मजीप्रा अधिकाºयांना दिल्यात. याबाबत सहा दिवसात जिल्हाधिकाºयांनी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. नेताजी चौकात स्थापन होणाºया शिवाजीच्या पुतळ्यासाठी बडनेरा नगरपरिषदेने जो ठराव घेतला होता त्यानुसार मनपाच्या प्रस्तावीत ५० हजार स्क्वेअरफूट मार्केटच्या जागेतील १ हजार फुटांची जागा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव त्वरित तयार करून शासनाकडे पाठवावा, असे निर्देश मनपा आयुक्ताना दिलेत.