राष्ट्रीय पवार क्षत्रिय कार्यकारिणी मंडळाची निवडणूक जानेवारीत होणार

0
25

गोंदिया,दि.०२: राष्ट्रीय पोवार क्षत्रीय महासभेच्या कार्यकारिणी मंडळाची बैठक तिरोडा येथे श्याम लॉनमध्ये पार पडली. या सभेत कार्यकारिणी मंडळाला मुदत वाढ देण्याचा प्रस्ताव फेटाळण्यात आला. कार्यकारिणी मंडळाचा कार्यकाल संपुष्टात आल्याने नियमावलीप्रमाणे नविन कार्यकारिणी मंडळाची निवडणूक घेण्यात यावी. या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. तसेच इतर ठराव ही पारित करण्यात आले. कार्यकारिणी मंडळाच्या सभेची अध्यक्षता राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.बी.एम. शरणागत यांनी केली. अध्यक्षीय भाषणात राष्ट्रीय पवार क्षत्रीय महासभेच्या कार्यकारिणी निवडणूक जानेवारी २०१८ मध्ये घेण्याची त्यांनी घोषणा केली. सभेला विशेष आमंत्रीत म्हणून आमदार विजय रहांगडाले, माजी आमदार डॉ.खुशाल बोपचे, माजी आमदार हेमंत पटले, खोमेश रहांगडाले, नेतराम कटरे, संरक्षक मंडळ सदस्य देवीqसह ठाकुर, प्रा.ज्ञानेश्वर टेंभरे, इंजि.टी.डी. बिसेन, माजी महासचिव प्रा.एच.एच. पारधी तसेच हरियाणा, राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसेड राज्यातील पोवार समाज संघटनेचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होेते.
समाजाचे गौरव व आदर्श राजाभोज व माँ गडकलिका यांच्या प्रतिमेचे पूजन करुन सभेला सुरुवात करण्यात आली. सभेचे अध्यक्ष डॉ.बी.एम. शरणागत यांनी कार्यकारिणी समोर चर्चेला येणाèया विषयाची माहिती दिली. त्या अनुषंगाने डोंगरगढ येथे तयार करण्यात येणाèया राजाभोज पवार क्षत्रिय धर्मशाळेच्या बांधकामासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. यावर्षी अनेक ठिकाणी पाऊस न आल्याने दुष्काळाची परिस्थिती आहे व बहुसंख्य पवार समाजाचा प्रमुख व्यवसाय शेती असल्याने या दुष्काळातून मार्ग काढण्यासाठी सर्व राज्यातील शासनाने शेतकèयांना मदत करावी यासाठी राष्ट्रीय समिती व राज्य संघटनेकडून निवेदन देण्याचा ठराव पारित करण्यात आला. पवार समाजाची राष्ट्रीय पवार क्षत्रिय महासभा सर्वोच्च समिती असल्याने देशातील समाजाच्या सर्व संघटनांनी संलग्नता करुन घ्यावी तसेच पदाधिकाèयांची यादी समितीला पाठवावी असे आवाहन करण्यात आले. अध्यक्षाच्या विषयाअंतर्गत येणाèया विषयामध्ये कार्यकारिणीचे उपाधयक्ष गुलाबराव बोपचे यांनी डोंगरगढ धर्मशाळेच्या कामाची गती कायम राहावी यासाठी सध्या असलेल्या कार्यकारिणीला मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव मांडला. मात्र या ठरावाला विरोध करुन राष्ट्रीय पोवार क्षत्रिय महासभेच्या नियमाच्या अनुदार ५ वर्षाचा कालावधी झाल्यानंतर निवडणूक घेवून नवीन कार्यकारिणी गठित करण्यात यावी अशी मागणी पदाधिकाèयांनी केली. महासभेचे महासचिव मुरलीधर टेंभरे यांनी अदानी प्रकल्पग्रस्त विषय मांडून शेतकèयांना योग्य मोबदला मिळाला नाही या विषयाला रेटून सभा उधळण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही. याप्रसंगी बोलताना आमदार रहांगडाले याांनी तिरोडा येथे राष्ट्रीय कार्यकारिणीची सभा आयोजित केल्याबद्दल पदाधिकाèयांचे आभार मानले व समाजाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहण्याचे वचन दिले. माजी आमदार डॉ. खुशाल बोपचे यांनी बहुसंख्य पवार समाज शेतकरी असून राज्यघटनेने आपणाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट केले असले तरी मनुवादी व्यवस्थेमुळे लाभ मिळाला नाही. त्यासाठी समाजाला पुढाकार घेण्याची गरज मांडली. माजी आमदार हेमंत पटले यांनी समाजाच्या विकासासाठी एकजुट होवून qचतन व मानन करण्याची गरज तर माजी जि.प. अध्यक्ष नेतराम कटरे यांनी संघटनेचे कार्य समाजापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात डॉ.बी.एम. शरणागत यांनी जानेवारी १८ मध्ये निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची घोषणा केली. याप्रसंगी धार येथील महाराजाधिराज हेमेंद्रqसगजी राजेपवार व प्रतिनिधी व प्रोटोकॉल ऑफीसर कु.नरेंद्रqसह पवार यांनी पदाधिकारी व निमंत्रिताचे पडगी घालून अभिनंदन व स्वागत केले. सभेचे संचालन संघटनेचे संघटक सचिव आई.डी. पटले यांनी तर अतिथी स्वागत तिरोडा पवार संघटनेचे बाबा भैरम, रमेश सोनवाने, अ‍ॅड. माधुरी रहांगडाले, मनिषा रहांगडाले, रचना टेंभरे, माला बिसेन, जानकी पटल, शीला बोपचे, ज्योती रहांगडाले, स्वाती पटले, रत्नकला रिनाईत, ललीता भैरम, देवी हरिणखेडे, अमृत पारधी, रुपचंद पारधी, आशिष पारधी, नितीन पाारधी, रविशंकर बोपचे, हंसराज रहांगडाले, जयप्रकाश भैरम, राजेंद्र रहांगडाले, ऋषीपाल कटरेी, मार्तन पटले, ओमप्रकाश पटले, शशिकला ठाकरे, अनुपमा पारधी, अनुसया पारधी, भुमेश्वरी कटरे, शिला गौतम, शर्मिला राणे, मंजु कटरे, भावना बघेले, कुमुद कटरे, मोनू सोनवाने, वनिता ठाकरे, सुनील पारधी, दिपा पटले, प्रज्ञा गौतम व इतर पदाधिकाèयांनी केले. सभेला गोंदिया येथील पवार प्रगतीशील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेश चव्हाण, सचिव किशोर भगत, पवार प्रगतीशील मंचचे अध्यक्ष संजय रहांगडाले, सुरेश भक्तवर्ती, सुरेश पटले, पारखन पटले, अनिल रहांगडाले तसेच उजैन, बैतुल, नागपृर, भंडारा, सुजानपूर, तुमसर, बालाघाट, वाराशिवनी, राजनांदगाव, डोंगरगढ, रायपूर, चंद्रपूर, अमरावती, qछदवाडा, बैहर, जबलपूर, दुर्ग येथील कार्यकारिणी सदस्य तसेच संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.