उपराजधानी सीसीटीव्हीच्या निगराणीखाली

0
12
नागपूर,दि.04– स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत उपराजधानी नागपुरातचा ३८०० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येत असून दिवाळीनंतर हा प्रकल्प प्रत्यक्षात सुरु होऊन उपराजधानी सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आलेली असेल, अशी माहिती स्मार्ट सिटी सोल्यूशन प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
या प्रकल्पांतर्गत साडेसातशे महत्त्वाच्या ठिकाणांवर सुमारे ३८०० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येत असून त्यापैकी अडीच हजारांच्या वर सीटीटीव्ही कॅमेरे एलअन्डटी या कंपनीच्या वतीने लावण्यात आले आहेत, अशी माहिती देण्यात आली. या प्रकल्पाचे नियंत्रण महानगर पालिका आणि नागपूर पोलिस अशा दोन्ही यंत्रणांकडे राहणार असून महापालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीत या प्रकल्पाचा नियंत्रण केंद्राचे काम सुरु आहे. तर पोलिस आयुक्त कार्यालयाच्या परिसरात पोलिसांच्या नियंत्रण केंद्राचे काम लवकरच सुरु होणार असल्याचे सांगण्यात आले. ही संपूर्ण यंत्रणा सुमार १२०० किलो मीटर अंतराच्या ऑप्टीकल फायबर नेटवर्कने जोडण्यात आली असून नियंत्रण कक्षांमध्ये विविध स्क्रीन्सवर लाईव्ह फिड उपलब्ध होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.