कर्मचाºयांच्या संपाने प्रवाशांचे हाल

0
8

तिरोडा,दि.20 : एसटी कर्मचाºयांचे मागील तीन दिवसांपासून संप सुरु आहे. शुक्रवारी संपाचा चौथा दिवस होता. शासन आणि एस.टी.कर्मचारी यांच्यात मागण्यांवरुन चर्चा फिस्कटली. त्यामुळे हा संप चिघळला आहे. दरम्यान दिवाळीच्या कालावधीत या संपामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.
स्थानिक आगारातील चालक, वाहक इतर कर्मचारी संपात सहभागी झाल्याने प्रवाश्यांची फारच गैरसोय होत आहे. दिवाळी व भाऊबिजनिमित्त बाहेरगावी जातात. ग्रामीण भागात एसटीच प्रवासाचे साधन असून प्रवाशांच्या सोयीचे आहे. मात्र गेल्या तीन दिवसांपासून एसटी कर्मचाºयांचा संप सुरू असल्याने त्याचा फटका ग्रामीण भागातील प्रवाश्यांना बसत आहे.
तिरोडा आगारातील ७४ वाहक, ७० चालक, तांत्रिक सहायक २५, इतर ३२ असे २०१ कर्मचारी संपात सहभागी असल्याचे सांगण्यात आले. तसेच अकोला, पुसद, आकोट, नागपूर, माहूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया या ठिकाणी गेलेले ८ चालक, ८ वाहक त्या ठिकाणीच गाडीसोबत अडकून पडलेले आहेत. संपाला कर्मचाºयांनी शंभर टक्के पाठींबा दर्शविला असून तिरोडा आगारातील सर्व ४४ गाड्या आगारात जमा करण्यात आल्या आहेत. एसटी कामगारांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा, यासह विविध मागण्यासाठी कर्मचाºयांनी संप पुकारला आहे. त्यात विविध संटघटना व कृती समितीच्या पदाधिकाºयांचा सहभाग आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत संप मागे घेणार नसल्याचे कर्मचाºयांनी सांगितले. एसटी कर्मचाºयांच्या मंडपाला तालुका काँग्रेस अध्यक्ष राधेलाल पटले यांनी भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. संपात संघटनेचे पदाधिकारी, कृती समितीच अध्यक्ष कलाम बाबा शेख, सदस्य असीम खान, हंसराज वैद्य, शिवकुमार कनोजे, ओमप्रकाश कावळे, विनायक मारकंड, राजू टेकाम, दत्ता बकरे, पाडुरंग शेंडे, एजाज खान पठान, शामा गाते, दिपक चौधरी, नरेश तिडके, राजेश झगेकार, विलास चव्हाण, महेश सपाटे, गणेश टेंभरे, सादिक पठान, अनिल सार्वे, नाशिक मेश्राम सहभागी झाले आहेत.