गडचिरोली व भंडार्यात बळीराजा गौरव दिन उत्साहात

0
28

गडचिरोली,दि.20 – भारतीय आद्य सिंधू संस्कृतीचे महानायक,महासम्राट बळीराजाचे उच्च-उदात्त संस्कृतीचे जागर करण्याच्या हेतूने बळीराजा यांचे राज्य घडविण्याच्या व विचार सर्व सामान्य शेतकरी,नागरिकापर्यंत  पोहोचविण्याच्या उद्देशाने गडचिरोली येथील इंदिरा चौकात राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने बळीराजा गौरव दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाला राष्ट्रीय ओबीसी युवा  महासंघाचे जिल्हाधक्ष रुचित वांढरे , परमानंद पुनमवार , तुषार वैरागडे , शरद गुंडावार , विजय कृपाकर , मोहन भाऊ मोटघरे , जितेंद्र चांदेकर , प्रतीक डांगे , राहुल भांडेकर , भास्कर पेटकर , शुभम जगतुलवार , भूषण रेचनकार , श्रेयस जुगनाके , चेतन बावणे हे उपस्थित होते.

भंडारा -ओबीसी सेवा संघ जिल्हा कार्यालयात बळीराजा उत्सव समितीच्या वतीने बळीराजा उत्सव (समारंभ ) आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून बळी उत्सव समितीचे अध्यक्ष ईलमे होते.प्रमुख अतिथी सुर्यवंशी यानी बळीराजा यांच्या जिवनावर प्रकाश टाकला.कार्यक्रमाला बळीराजा उत्सव समिती, ओबीसी सेवा संघ व ओबीसी विद्यार्थी संघाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष गोपाल सेलोकर यांनी आभार मानले.