25.2 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home विदर्भ कर वसुलीला व्यापार्‍यांचा विरोध,पथक व व्यापार्‍यांत हमरीतुमरी

कर वसुलीला व्यापार्‍यांचा विरोध,पथक व व्यापार्‍यांत हमरीतुमरी

0
30

गोंदिया : दिवसेंदिवस कर वसुलीचा आकडा वाढत जात असतानाच या कर वसुलीचा मोहिमेचा व्यापार्‍यांकडून विरोध वाढत असल्याचे चित्र सध्या शहरात बघावयास मिळत आहे. यामुळेच शुक्रवारी (दि.२३) शहरातील काही व्यापार्‍यांनी कर वसुली पथकासोबत हमरीतुमरी केल्याचा प्रकार घडला. तर एका प्रकरणात खुद्द नगराध्यक्षांनी संबंधीत व्यापार्‍याची गॅरंटी घेतल्याचीही माहिती आहे.फूलचूर रोडवरील सुझूकी शोरुम कडे सुमारे तीन लाखाची करवसुली पथक घेण्याकरीता गेले असता तिथे सुध्दा व्यापारी व नगरपालिक कमर्चारी यांच्या शाब्दिक चकमक व शिविगाळ करेपयर्ंत वातावरण पोचले होते.व्यापारी तर चक्क मारहाण करण्याच्या तयारीत असल्याचेच चित्र होते.
मुख्याधिकारी सुमंत मोरे यांच्या नेतृत्वात नगर परिषदेची कर वसुली मोहिम सुरू आहे. या मोहिमेंतर्गत पथकाने शुक्रवारी (दि.२३) शहरातील काही मोठय़ा थकबाकीदारांकडे धडक दिली. यातील एका दुचाकी वाहनांच्या शोरूममध्ये गेले असता संबंधीत व्यापार्‍याने मुख्याधिकारी मोरे यांच्यासोबत कर वसुलीवरून बाचाबाची केली. ही बाचाबाची एवढी वाढली की त्या व्यापार्‍याने पथकावर चक्क खुर्ची उचलली. बाचाबाचीचा हा प्रकार रिंग रोडवरील संत तुकाराम शाळेतही घडला. तर तेथून आल्यावर श्री टॉकीज रोडवरील बग्गा इलेक्ट्रॉनिक्समध्येही संचालकांनी मुख्याधिकारी मोरे यांच्यासोबत चांगलाच वाद घातला. यातून नगर परिषदेच्या कर वसुली मोहिमेला शहरातील थकबाकीदारांचा चांगलाच विरोध असल्याचे दिसून येत आहे. असे असतानाही पथकाने शुक्रवारी (दि.२३) तीन लाख ४५ हजार रूपयांची रोख, २६ हजार रूपयांचे धनादेश मिळवले. शिवाय पाच लाख १0 हजार रूपयांचे पोस्ट डेटेड चेक सुद्धा पालिकेने मिळविले आहेत.
नगर पालिकेच्या कर वसुलीत राजकीय हस्तक्षेप ही सर्वात मोठी अडसर असल्याचे बोलले जाते. मात्र त्याची प्रचिती शुक्रवारी आली.काँग्रेस,राष्ट्रवादी ,भाजप व सेनेच्या नेत्यामुळेच येथील व्यापारी गब्बर झाले असून कर चुकवित आहेत.वास्तविक सामान्य व्यक्ती आपला कर जमा करीत असताना व्यापारी वगार्ची व काही तथाकथीत नेत्यांची दादागिरीच सुरु असल्याचे चित्र बघावयास मिळत असून गोंदियाला खर तर एक खमक्या अधिकारीची गरज भासत आहे,जो कुठल्याही नेत्याना व व्यापायाना न जुमानता काम करुन कर वसुलीसोबतच अतिक्रमण हटविण्यात पुढाकार घेऊ शकेल.
कर वसुलीची ही मोहीम पोलिसांशिवायच सुरू आहे. परिणामी थकबाकीदार पथकावर आपला रोष काढत आहे. विशेष म्हणजे व्हीडीओ शुटींग होत असल्याने फक्त बाचाबाचीवरच प्रकरण मिटत आहे अन्यथा अनर्थ ही घडू शकतो. पोलीस पथक एकच दिवस सोबत होते. पोलीस पथकासाठी पालिकेला आठ हजार रूपये दररोज मोजावे लागत आहे. त्यामुळे मुख्याधिकारी मोरे यांनीच पोलीस पथकावर पैसे खर्च न करता कर वसुली पथकासोबत वसुलीची मोहीम राबविण्यास सांगीतले आहे.