पत्रकार भवनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

0
7

अमरावती,दि.22 – जिल्हा मराठी पत्रकार परिषदेला दैदिप्यमान असा इतिहास लाभला असून अतिशय नामवंत पत्रकारांनी या परिषदेचे अध्यक्षपद भूषवून गौरवात्मक कार्य केले आहे. अमरावती जिल्हा मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातील पत्रकारांसाठी स्वतंत्र आणि हक्काच्या पत्रकार भवनाचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या हस्ते लोकार्पण होत आहे. पत्रकारांचे जिल्ह्यात भवन असावे हे जिल्ह्यातील पत्रकारांचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्र यानिमित्ताने पुर्णत्वास जात आहे. हा क्षण अमरावतीकर पत्रकारांसाठी आनंददायी ठरणारा आहे.