शहीद जवानांना मानवंदना

0
29

गडचिरोली,दि.22 : पोलीस हुतात्मा दिनानिमित्त १ सप्टेंबर २०१६ ते ३१ आॅगस्ट २०१७ या कालावधीत शहीद झालेल्या पोलीस जवानांना मानवंदना अर्पण करण्यात आली.
यावेळी सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. विपीन ईटनकर, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी (आॅपरेशन) समिरसिंह साळवे, पोलीस उपअधीक्षक (गृह) प्रदीप चवगावकर, गडचिरोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे, सीआरपीएफचे डेप्युटी कमांडर यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते.
चालू वर्षात गडचिरोली जिल्ह्यात सुरेश लिंगा तेलामी हा जवान शहीद झाला. हुतात्मा स्मृती दिनानिमित्त देशभरातील शहीद पोलीस जवानांना श्रद्धांजली अर्पण केली जाते. याच कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात करण्यात आले. शहीद पोलीस जवानांना पोलीस पथकाद्वारे बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. यावेळी उपस्थित पोलीस अधिकारी व महसूल विभागाच्या अधिकाºयांनी शहीद पोलीस कुटुंबियांची भेट घेऊन त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. या समस्या सोडविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले.

गोंदियातही शहिदांना श्रध्दांजली007-GONDIA-POLICE-SMRUTI-DAY-768x513

गोंदिया,-जिल्ह्यात नक्षल हल्यात शहीद झालेल्या शहीद जवानांना शहिद दिनाचे अवचित्त साधून पोलीस मुख्यालयात जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे,पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांनी शहिदांना पुष्पचक्र अर्पित करून श्रद्धांजली वाहिली. पोलीस पथकाने आपल्या मित्रांना गमविल्याचे दुःख व्यक्त करत हवेत तीन गोळ्या झाडून शहिदांना श्रद्धांजली वाहिली.संपूर्ण राज्यात दरवर्षी २१ आक्टोंबर हा कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या स्मृती प्रित्यर्थ देशभर साजरा केला जातो. आता पर्यत संपूर्ण राज्यात ३०० च्या वर पोलीस अधिकारी कर्मचारी शहिद झाले असून. एकट्या गोंदिया जिल्ह्यात जिल्ह्याची निर्मिती झाल्या पासून गेल्या १८ वर्षात नक्षली हल्यात २३ जवान शहिद झाले.