सीडीसीसीच्या बालापूर बँकेत 30 लाखाचा घोटाळा

0
9

ब्रम्हपुरी,दि.30 :- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तळोधी त. नागभीड जि. चंद्रपूर शाखेशी संलग्न पे-ऑफीस बालापूर येथे अंदाजे ३० लाख रुपयांचा घोटाळा करण्यात आला आहे असे दिसून येते आहे. या घोटाळ्यात एकाच कर्मचार्‍याचे नाव पुढे येत असले तरी या घोटाळ्यात मोठे रॅकेट असल्याची चर्चा आहे. संबंधित कर्मचार्‍याकडून पैसे वसूल झाले नसल्याने कर्मचारी, ठेवीदार, खातेदार यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तळोधी त. नागभीड जि. चंद्रपूर शाखेशी संलग्न पे-ऑफीस बालापूर शाखेतील बॅंक व्यवस्थापकाने लाखांचा घोटाळा केल्याचे उघड झाले आहे. या कर्मचार्‍याने इतर खातेदारांच्या खात्यांतून पैशांची फिरवाफिरवी केली असल्याचा प्रकार ध्यानात आला. जे खातेदार वेळोवेळी खात्याची माहिती घेत नाहीत, अशाच खातेदारांच्या खात्यांवरील पैसे गायब करण्यात आले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर बँक वर्तुळात एकच खळबळ माजली. हा घोटाळा उघड झाल्यानंतर संबंधित कर्मचार्‍यावर कारवाई करण्याचे संकेत बँक पदाधिकारी व अधिकार्‍यांनी दिले आहेत; मात्र आत्तापर्यंत या कर्मचार्‍याकडून रुपयाही वसूल करण्यात आलेला नाही. तसेत कोणत्याही प्रकारची पोलिस कारवाई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पदाधिकारी व अधिकार्‍यांनी केली नाही असे निदर्शनास आले आहे; त्यामुळे बँकेच्या कार्यक्षेत्रात उलटसुलट चर्चा सुरू आहे.