गोसेखुर्द प्रकल्पासाठी जल आयोगाकडून ७५० कोटी

0
13

नागपूर,दि.01 :गोसेखुर्द  राष्ट्रीय सिंचन प्रकल्पालासाठी केंद्रीय जल आयोगाने नाबार्डमार्फत ७५० कोटींचा निधी उपलब् ध केला आहे. यामुळे प्रकल्पांच्या रखडलेल्या कामांना गती मिळाली आहे. ४२१ कोटींच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मुख्यकालव्यातून बंद नलिकांव्दारे थेट शेतकऱ्यांच्या शेतात पाणी नेण्यात येणार आहे. यामुळे लाभ क्षेत्रातील ३०६००हेक्टर क्षेत्राला प्रत्यक्ष सिंचनाचा लाभ मिळणार आहे.
या प्रकल्पामुळे नागपूर, भंडारा, चंद्रपूर या जिल्ह्यांच्या विकासाला नवी दिशा देणारा ठरणार आहे. त्यामुळे राज्य व केंद्र शासनाने अपूर्ण असलेली कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पाचे मुख्य धरणाचे काम पूर्ण झाले असून प्रकल्पामध्ये ६२० दशलक्ष घनमीटर जलसाठा उपलब्ध झाला आहे. या प्रकल्पातून ६२२६३ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. वितरिकेची कामे पूर्ण झाल्यानंतर सुमारे २ लाख ५० हजार ८०० हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार असून २०२० पर्यंतचे नियोजन करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ
४या प्रकल्पाच्या कामांना गती मिळाल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत सिंचनासाठी पाणी मिळत आहे. भातासह इतर पीकांच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पूर्व विदभार्साठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या या प्रकल्पामधून उजवा कालवा ९९ किलोमीटरचा असून भंडारा व चंद्रपूर या जिल्ह्यातील सुमारे ७१८१० हेक्टर सिंचन निर्माण होणार असून त्यापैकी १३९२६ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा प्रत्यक्ष लाभ मिळत आहे. डावा कालवा हा १३ किलोमीटरचा असून यामधून ३१५७७ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे. त्यापैकी १० ६८३ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळत आहे. ४३ किलोमीटर मुख्य कालव्यातून १२३५६ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचे पाणी उपलब्ध झाले आहे.

चार उपसा सिंचन योजना
४या प्रकल्पावर चार उपससिंचन योजना असून यामध्ये टेकेपार उपसासिंचन योजनेवर ७७१० हेक्टर, आंभोरा उपसासिंचन योजनेवर १११९५ हेक्टर, मोखाबर्डी उपसासिंचन योजना तसेच नेरला उपसासिंचन योजनेवरही प्रत्यक्ष सिंचनाला सुरुवात झाली आहे. या प्रकल्पातून पूर्ण क्षमतेने सिंचन सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी तीन वर्षाचा कालबध्द नियोजन आराखडा तयार करण्यात आला असल्याची माहिती गोसेखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता अरुण कांबळे, तसेच अधीक्षक अभियंता जे.एम. शेख यांनी दिली.
प्रकल्पाची प्रमुख उद्दिष्टे
४डिसेंबर २०१७ पर्यंत ९४० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा व आॅक्टोबर २०१८ पर्यंत ११४६ दलघमी पूर्ण पाणीसाठा निर्माण करणे.
४धरणाचे सांडव्यामधील चार बांधकाम विमाचके बंद करण्याचे काम पूर्ण करणे.
४मोखाबर्डी उपसासिंचन योजना कार्यान्वित करून १४९८ हेक्टर व जून २०१८ पर्यंत अतिरिक्त ७२५० हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ देणे.
४बंदनलिकेद्वारे ४२२०० हेक्टर क्षेत्रावर सिंचन क्षमता निर्माण करणे.
४कालव्यावरील पाच उपसासिंचन योजना जून २०१९ पर्यंत पूर्ण करणे.