नापीकी व रोगाने पीक नष्ट:शेतकºयांच्या मदतीठी आ. पुराम व परिणय फुकेंची धाव

0
17

रोगाने नासाडी झालेल्या पिकांचे सर्वेक्षणाचने आदेश

आमगाव,दि.03 : पूर्वीच अल्प पावसामुळे अनेक शेतकºयांनी पीक घेण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. तर अनेकांनी पावसाअभावी शेतीच केली नाही. यात ज्या शेतकºयांनी धान व हंगामी पीक घेण्यासाठी रोवणी केली परंतु शेतातील उभ्या पिकांना रोगांनी भुईसपाट केली. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला. या शेतकºयांना तातडीने मदत मिळावी यासाठी आ. संजय पुराम व परिणय फुके यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेवून तातडीची मदतीची मागणी केली.जिल्ह्यातील आमगाव, सालेकसा, देवरीसह इतर तालुक्यात धान पिक व हंगामी पिकांवर रोगाच्या साथीने नुकसान केलेले आहे. या सर्वेक्षणासाठी प्रशासनच्या वतीने प्रत्यक्ष जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे व आमदार संजय पुराम उद्या (दि.३) तालुक्याचा दौरा नियोजित आहे.

गोंदिया जिल्ह्यातील आमगाव, देवरी, सालेकसा व इतर तालुक्यांमध्ये शेतकºयांनी अल्प पावसामुळे शेतपीक घेण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. यात अनेक शेतकºयांनी पहिली पेरणी हातातून गेल्यावर दुबार पेरणी करुन धान पिक व हंगामी पीके घेण्यासाठी परिश्रम घेतले.शेतकºयांनी पीक घेताना खर्च भागविण्यासाठी शेतकामासाठी सावकार व खासगी बँक, सहकारी बँका यांच्याकडून कर्ज उचलून खर्च भागविला. परंतु पर्यावरण बदलामुळे पावसाने पूर्तता पेक्षाही कमी पावसाची हजेरी लावली. त्यामुळे पीकावर संकट निर्माण झाले. त्यामुळे शेतकºयांवर आर्थिक नुकसान झाले. यात जेमतेम उभे असलेले पिकांवर भावा, तुडतुडा, गादमासा या रोगांच्या साथीने संपूर्ण पीकच भुईसपाट झाले. त्यामुळे शेतकºयांच्या भावि नियोजनावर घात झाला व शेतकरी पुन्हा कर्जाच्या ओझ्याखाली पडला.

जिल्ह्यातील शेतकºयांवर या अस्मानी संकटाला टाळता यावे यासाठी शासनाने तातडीची मदत व कर्जमाफी याची यासाठी आमदार संजय पुराम व विधान परिषद सदस्य परिणय फुके यांनी शासनाकडे साकळे घातले. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात बैठक घेवून शेतकºयांना तातडीने मदत मिळावी यासाठी पिकांचे सर्वेक्षण करण्याची मागणी केली. यावर मुख्यमंत्री विभागांना सुचना करुन शेतकºयांच्या पिकाचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले.