तिरोड्यात आ.रहागंडाले व जिल्हाधिकार्यानी केली पाहणी

0
12

 

तिरोडा,दि.03 : पूर्वीच अल्प पावसामुळे अनेक शेतकºयांनी पीक घेण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. तर अनेकांनी पावसाअभावी शेतीच केली नाही. यात ज्या शेतकºयांनी धान व हंगामी पीक घेण्यासाठी रोवणी केली परंतु शेतातील उभ्या पिकांना रोगांनी भुईसपाट केली. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला. या शेतकºयांना तातडीने मदत मिळावी यासाठी गोरेगाव तिरोडा मतदारसंघाचे आमदार विजयभाऊ रहागंडाले यांनी गुरुवारला जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांच्यासोबत तिरोडा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतपिकांची पाहणी केली. उभे असलेले पिकांवर भावा, तुडतुडा, गादमासा या रोगांच्या साथीने संपूर्ण पीकच भुईसपाट झाल्याचे पाहणी दरम्यान चित्र दिसून आले.