तूमसर,दि.09 : माडगी जवळील मुंबई – हावडा रेल्वे लाईन वरील तिसऱ्या रेल्वे लाईनसाठी मोठ्या पुलाचे बांधकाम सुरु झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे नुकसान होत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या तक्रारीवर दखल घेऊन शिवसेना जिल्हाप्रमुख इंजी. राजेंद्र पटले मौक्यावर प्रत्येक्ष जाऊन स्थानिक शेतकऱ्यांसोबत शेतपिकांची पाहणी केल्यावर खरच कंत्राटदारपासून मोठ्या प्रमाणत शेतपिकाचे नुकसान होत आहे हे निष्पन झाले. तो नुकसान थांबविण्यासाठी संबंधितांशी इंजी. राजेंद्र पटले, शिवसैनिक व शेतपीक नुकसानग्रस्त शेतकरी अशोक मते, ताराचंद शेंडे, रामनाथ शेंडे,उमेश शेंडे, राजकुमार शेंडे, महेंद्र शेंडे, वासुदेव शेंडे, रामेश्वर कहालकर, आनंदराव काहालकर, विठ्ठल काहालकर, गोविंद शेंडे सह इतर शेतकरी यांनी सकारात्मक चर्चा करून तातडीने या विषयवार तोडगा काडून शेतकऱ्यांना मदत करावे असे ठरविण्यात आले. सदर पोच मार्गावरील डांमरिकरण करण्यात यावे, नुकसानग्रस्त शेतपीकाचा मोबदला मिळावा अशी सूचना देण्यात आली. यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुधाकर कारेमोरे, तालुका प्रमुख नरेश उचीबघले, शहर प्रमुख नितीन सेलोकर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अमित एच. मेश्राम, उपशहर प्रमुख जगदीश त्रीभूवनकर, गुड्डू डहरवाल, योगेश सोनकुसरे, कामगारसेना तालुका अध्यक्ष मनोहर जांगळे, प्रकाश चौधरी, अंकुश पटले सह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.





