24.8 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home विदर्भ ओवारा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कमल यांची पुन्हा वर्णी

ओवारा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कमल यांची पुन्हा वर्णी

0
26

देवरी,दि.11- देवरी तालुक्यातील ओवारा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदासाठी आज झालेल्या निवडणुकीत उपसरपंच पदी कमल येरणे यांची निवड करण्यात आली. 
16 ऑक्टोबर रोजी झालेल्या निवडणुकीत भाजप समर्थित पॅनलचे हिरामण टेकाम हे सरपंच पदी निवडून आले होते. सदस्यपदी वनिता राऊत, देवमित्रा गजभिये, मंगला सोनवाने, निलवंता मसराम, कमल येरणे हे निवडून आले. कमल येरणे यांची ही चवथी इनिंग असून मागील दोन वेळा येरणे यांनी  ओवारा ग्रामपंचायतीचे सरपंच पद भूषविले होते.
आज झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत ते अविरोध उपसरपंचपदी निवडून आल्याने त्यांचे उमेश येरणे, देवेंद्र डोये, लता वल्के, लखन कोकोडे, सुरेश बिसेन, सुरज कोडवते. संदीप मोटघरे, मनिराम वल्के, विजय खरवडे, भूषण सराटे, बुधराम पटले,राजू उईके, श्रीजित ओंकार,मोहनलाल परतेती, रामकृष्ण पंधरे आदींनी अभिनंदन केले.