मुल्ला ग्राम पंचायतीच्या उपसरपंचपदी कांग्रेसच्या सीमा इंद्रराज नाईक

0
20

    seema देवरी,दि.11- तालुक्यातील सर्वांचे लक्ष वेधणाऱ्या मुल्ला ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाची निवडणूक सत्ताधारी पक्षाने नामांकन दाखल न केल्याने अखेर बिनविरोध झाली. या निवडणुकीत कॉंग्रेसच्या सीमा इंद्रराज नाईक या उपसरपंचपदी विराजमान झाल्या. सविस्तर असे की, मुल्ला ग्रामपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सरपंचपद हे भारतीय जनता पक्षाच्या पारड्यात गेले. उल्लेखनीय म्हणजे 60 टक्के मते घेत कॉंग्रेस समर्थित पॅनलचे 7 उमेदवार हे सदस्य म्हणून निवडणून आले. त्यामुळे सरपंचपद जरी भाजपला मिळाले असले तरी बहुमताला मुकावे लागले होते. असे असले तरी उपसरपंचपद हे आपल्याच पारड्यात पडणार, असा दावा सत्ताधारी पॅनल कडून केला जात असल्याच्या कारणाने उपसरपंचपदी कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

आज उपसरपंचपदाची निवडणुक नवनिर्वाचित सरपंच के.डी. गौपाले यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी परिवर्तन पॅनेलच्या सातही सदस्यांनी एकजुटीने दर्शन घडविले. यामुळे सीमा नाईक यांचे एकमेव नामांकन दाखल करण्यात आले होते. सर्व प्रयत्न फसल्याने अखेर सत्ताधारी पॅनलकडून एकही नामांकन दाखल करण्यात आले नाही. परिणामी, सीमा नाईक यांची उपसरपंचपदावर अविरोध निवड करण्यात आली. यावेळी राजकुमार खोटेले, नेतराम वघरे,चंदन घासले, प्रभा वंजारी, छन्नू कांबळे,संगिता नागोसे या नवनियुक्त सदस्यासंह माजी सरंपच भोजराज घासले, रामभाऊ गौपाले, संपत शिवणकर, तुलाराम वैद्य, तुकाराम धुर्वे, मनीराम घासले, शिवराम घासले, शालिकराम हत्तीमारे आदी नागरिकांनी नवनियुक्त उपसरपंच नाईक यांचे अभिनंदन केले.