24.8 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home विदर्भ चारचाकी वाहनाच्या धडकेत दोन गंभीर

चारचाकी वाहनाच्या धडकेत दोन गंभीर

0
24

कुरखेडा,दि.12 – अज्ञात चारचाकी वाहनाच्या धडकेत दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास कुरखेडा – वैरागड मार्गावरील कराडी गावाजवळ घडली.विशेषराव कुमरे (४५) रा. कराडी, तेजराव मरसकोल्हे (४०) रा. विहिरगाव अशी जखमींची नावे आहेत. अपघाताची माहिती मिळताच जि.प. सदस्य भाग्यवान टेकाम यांनी घटनास्थळावर धाव घेऊन जखमींना उपचारासाठी कुरखेडा येथे दाखल केले. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष राम लांजेवार, जिल्हा सचिव विलास गावंडे, युवा नेते उल्हास देशमुख उपस्थित होते.  जखमींवर प्राथमिक उपचारानंतर संदर्भ सेवेसाठी त्यांना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले.