नया अकोला येथील आरोग्य शिबिराला प्रचंड प्रतिसाद 

0
14
  अमरावती,दि.15ः-स्मृती सेवाश्रम नया अकोला व आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे यांच्या सयुंक्तवतीने नया अकोला येथे 14 नोव्हेंबरला आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात २२ गरजु व गरीब रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आले आहे. हे शिबिर रुग्ण सेवक व जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले . या शिबिरात पुसदा , वलगाव , निंभा , निधोळी ,कृष्णापुर, बदलापूर ,चंडिकापुर ,चांदुर बाजार , या परिसरातील गरजु व गरीब रुग्ण मोठ्या प्रमाणात सहभागी झाले. या शिबिरात उपस्थित डॉ जयकृष्ण रोडे, डॉ भटकर,अनुल्ला खान हे उपस्थित होते.