राष्ट्रवादी ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्षपदी दोनोडे

0
7

गोंदिया,दि.17ः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते राज्यसभेचे खासदार प्रफुल पटेल व माजी आमदार राजेन्द्र जैन यांनी गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी आघाडीच्या अध्यक्षपदी सालेकसा तालुक्यातील प्रभाकर दोनोडे यांची नियुक्ती केली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे यांनी दोनोडे यांचे स्वागत करुन ओबीसी आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली.यापुर्वी ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष बबलू कटरे होते,त्यांनी एकवर्षापुर्वीच आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते. दोनोडे यांच्या नियुक्तीबद्दल माजी जि.प.अध्यक्ष विजय शिवनकर, राष्ट्रवादीचे प्रदेश महासचिव मनोहर चन्द्रीकापूरे,जिल्हापरिषद सदस्य दुर्गाताई तिराले,जिल्हा परिषद  सदस्य किशोर तरोणे, रमेश ताराम, तुकाराम बोहरे,गजानन परशुरामकर,गोपाल तिराले,मनोज शरणागत,श्री लिल्लाहे,गोपाल तिराले आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.